विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणामुळे रुग्णाला परत मिळाले पाकीट 

विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणामुळे रुग्णाला परत मिळाले पाकीट 

जळगाव : आजकाल समाजात प्रामाणिकपणा कमी झाल्याचा प्रत्यय अनेकदा सर्वांनाच येत असल्याची उदाहरणे आहेत. पण प्रामाणिक माणसे आजही समाज व्यवस्थेत आहेत, हे जळगावात घडलेल्या प्रकारानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ऍड. बबन बाहेती महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्याला प्रभात कॉलनी चौकात साडेसहा हजार रुपये असलेले पाकीट सापडले. त्याने ते पाकीट घेऊन थेट जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. जिल्हापेठ पोलिसांनी कसोशीचे प्रयत्न करून दोन तासांतच पाकीट हरविलेल्या व्यक्तीचा शोध लावून सुखरूप त्याच्या हाती दिले. 
बाहेती महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी पंकज सुधाकर अडकमोल (वय 19) हा आज दुपारी एकलव्य क्रीडा संकुलात बॉक्‍सिंगच्या सरावासाठी आला होता. सराव दुपारी अडीचला घराकडे जुने जळगाव येथे जात असताना प्रभात कॉलनी चौकातच त्याला पैशांनी भरलेले पाकीट सापडले. त्याने क्षणाचाही विलंब न करता जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठत हकिकत सांगितली. पाकीट हातात पडल्यावर ठाणे अंमलदार शिवाजीपवार, प्रवीण भोसले यांनी हसतमुखाने त्याला प्रतिसाद देत कौतुक केले. पाकिटात नाव, पत्ता शोधत असताना त्यात गणेश गव्हाळे यांचा क्रमांक व पासपोर्ट फोटो सापडला. तत्काळ पोलिस ठाण्याच्या दूरध्वनीवरून संपर्क करीत या तरुणाचा शोध सुरू करण्यात आल्यावर कानळदा येथील राजू रमेश साळुंखे (चहा विक्रेता) यांचे पाकीट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा मोबाईल नंबर मिळवून पाकीट हरविल्याची खात्री करण्यात आली. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून पाकिटातील 6 हजार 430 रुपये रोख, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज सोपविण्यात आला. 

पाणावलेल्या डोळ्यांनी आभार 
राजू रमेश साळुंखे याचे यमुनाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. 21) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला असून, तत्पूर्वी आवश्‍यक तपासण्यांसाठी फिरत असताना त्यांच्या खिशातून पाकीट पडले होते. शस्त्रक्रियेचा ताण, त्यात रोकडसह पाकीट लंपास झाल्याने तणावात वाढ झाली असतानाच पाकीट सुखरूप परत मिळाल्याने त्यांनी पंकज अडकमोल या तरुणाला चक्क पाणावलेल्या डोळ्यांनी नमस्कार करीतच आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com