कापसाने भरलेला ट्रक उलटला; नऊ मजुर जखमी 

live photo
live photo

जळगाव : बोदवड येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर ट्रक पाळधी बायपास जवळ अचानक फेल होवुन उलटल्याने झालेल्या अपघातात नऊ मजूर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर भरदुपारी पावणे तीन वाजेला घडलेल्या या अपघातात जखमींना जिल्हारुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले असुन ट्रकच्या केबीनवर बसलेले दोघे तरुण खाली फेकेले जावुन समोरुन आलेल्या ट्रक आले. सुदैवाने समोरचा ट्रक जागच्या जागीच थांबलाअसल्याने दोघांचा जिव वाचला.पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

बोदवडसह भुसावळ येथून कापूस भरून धुळ्याकडे जाणारा आयशर क्र (एमएच.19. ए.ए. 1080) ट्रक पाळधी बायपासवरुन एरंडोलच्या दिशेने जातांना अचानक जागच्याजागी ट्रक थांबुन कलंडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातग्रस्त ट्रकच्या केबीनवर बसलेल्या मजुरांसह प्रवासी खाली फेकेले जावुन जखमी झाले. जखमींमध्ये सोमेश नामदेव चौधरी (वय- 24) , भाऊसाहेब पाटील (वय- 30), रितेश गोकुळ मराठे (वय- 20) , सुनिल शिवदास सैदाणे (वय 41), सुरेश सोमा मोरे (वय 40), दिनेश देविदास पाटील (वय 25) , प्रदिप रणछोड लोहार (वय 39), गुलाब पौलाद मोरे(वय 40), समाधान अंकुश पाटील (वय 34) (रा. सर्व मुकटी ता. जि. धुळे) हे जखमी झाले आहे. अपघात घडताच रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहन धारक व पाळधी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना शासकिय 108 ऍम्बुलन्स आणि सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ऍम्बुलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाळधी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

धावता ट्रक जागीच थांबला 
कापसाने भरलेला ट्रक पाळधी गावाजवळ बायपास रोडवरुन जात असतांना अचानक ट्रक फेलहोवुन कलंडला, महामार्गावर रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटून मजुर फेकले गेल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पुर्णत:ठप्प झाली होती. अपघातग्रस्तांना रुग्णालयात रवाना केल्यावर ट्रक आणि विखुरलेला कापुसमाल उचलण्यात येवुन वाहतुक सुरळीत करण्यात आली. 

ट्रकखाली सापडुनही दोघे बचावले 
कापसाच्या ट्रकवर बसलेले मजुर प्रवसी रितेश मराठे व सोमनाथ चौधरी हे दोघे तरुन अपघातग्रस्त आशरच्या ट्रकवर बसलेले होते. अपघात घडला त्यावेळी दोघेही समोरच्या बाजुने फेकले गेले. दोघ तरुण खाली कोसळताच एरंडोलकडून जळगावकडे येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचालकाने पसंगावधान राखत ट्रक जागच्याजागी थाबवला. रितेश व सोमनाथ दोन्ही तरुणांवर ट्रक आला असतांना सुदैवाने चाकाखाली न आल्याने दोघांचे प्राण वाचले. मृत्युवशी थेट भेटगाठ घडल्याचा हा प्रसंग दोघा तरुणांनी सांगीतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com