जिल्ह्यात 46 हजार क्विंटल तूर खरेदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

जळगाव ः जिल्ह्यात यंदा प्रथमच "नाफेड'तर्फे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हरभरा खरेदीसाठी पाच केंद्रे सुरू झाली असून, त्याद्वारे चार हजार क्विंटल खरेदी करण्यात आली. तसेच 46 हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे ही खरेदी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी तूर, हरभरा विक्रीसाठी 
ऑनलाइन नोंदणी केली आहे त्याच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होत आहे. 

जिल्ह्यात सुरवातीस अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर केंद्र सुरू झाले. जळगाव, चोपडा येथील केंद्र उशिरा सुरू झाले. आतापर्यंत रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव या केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे. एकूण 46 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. चार तूर खरेदी केंद्रांमध्ये सध्या खरेदीसाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ते सध्या सुरू नाहीत. 

हरभरा खरेदीचे चारच केंद्र 
हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात बारा केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील भडगाव, यावल, रावेर व पाचोरा ही केंद्रे सुरू झाली आहेत. पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव येथे हरभरा खरेदी सुरूच झालेली नाही. चार खरेदी केंद्रांमध्ये चार हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली. हरभरा खरेदीस चार हजार चारशे, तर तुरीला पाच हजार 450 रुपये भाव दिला जातो. बाजारभावापेक्षा हा भाव अधिक असल्याने शेतकऱ्यांचा तूर, हरभरा विक्रीस चांगला प्रतिसाद आहे.

Web Title: marathi news jalgaon tur kharedi