उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेत दोनवरून पाच लाखांपर्यंत वाढ 

उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेत दोनवरून पाच लाखांपर्यंत वाढ 

जळगाव ः महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तीन लाख रुपयांची वाढ करून आता पाच लाख रुपये मर्यादा निश्‍चित केली आहे. मात्र, उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे. 
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने दोन लाख रुपये निश्‍चित केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान प्रक्रियेपर्यंत उमेदवारांकडून होणारा दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने खर्चाच्या मर्यादेत तीन लाखांची वाढ केली असून प्रत्येक उमेदवारांना खर्चाची मर्यादा पाच लाख रुपये निश्‍चित केली आहे. उमेदवारांनी केलेला खर्च राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या "ट्रू वोटर' या अँड्रॉईडबेस मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून भरावयाचा आहे. 

राजकीय पक्षांना 60 दिवसांची मुदत 
निवडणूक संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदान प्रक्रियेपर्यंत होणारा दैनंदिन खर्चाचा तपशील उमेदवारांना 30 दिवसांच्या आत तर राजकीय पक्षांना 60 दिवसांच्या आत महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाचे आहे. 

खर्च सादर करण्याबाबत उद्या प्रशिक्षण 
महापालिका निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च "टू वोटर' या ऍप्सवर भरणे बंधनकारक आहे. मात्र, तांत्रिक अडचण येत असल्याने अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक खर्च सादर करण्याबाबत प्रशिक्षण येत्या मंगळवारी (17 जुलै) दिले जाणार आहे. दुपारी महापालिकेच्या सभागृहात दुपारी बाराला प्रशिक्षण होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com