अहमदनगरला निघालेली पोलिस व्हॅन उलटली 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

अहमदनगरला निघालेली पोलिस व्हॅन उलटली 

जळगाव: नगर येथे पोलिस बंदोबस्तासाठी जाणाऱ्या जळगाव पोलिसांची व्हॅन उलटून अकरा पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना नेवासे फाट्याजवळ आज सकाळी साडेसातला घडली. 

अहमदनगरला निघालेली पोलिस व्हॅन उलटली 

जळगाव: नगर येथे पोलिस बंदोबस्तासाठी जाणाऱ्या जळगाव पोलिसांची व्हॅन उलटून अकरा पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना नेवासे फाट्याजवळ आज सकाळी साडेसातला घडली. 

शहरात तीन दिवसांपूर्वी शिवसेना कार्यकर्ते संजय कोतकर, वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे तेथील पोलिस अधीक्षक कार्यालयावरच हल्ला होऊन तणाव वाढल्यामुळे संपूर्ण नाशिक परिक्षेत्रातून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. त्यानुसार जळगाव पोलिस दलातील 150 कर्मचारी 10 अधिकाऱ्यांचा ताफा नगरच्या दिशेने रवाना झाला होता, त्यापैकी एका वाहनाला हा अपघात झाला. जखमींमध्ये सागर पाटील, विजय मधुकर, मनोज तडवी, अमोल भोसले, मनोज पाटील, हेमंत पाटील, महेंद्र उमाळे, श्‍याम भिल, प्रदीप चव्हाण व अशोक मोरे यांचा समावेश आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, सर्व जखमींना नेवासा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पोलिस वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आहे. 

जखमी सायंकाळी जळगावात 
अपघात झालेल्या व्हॅनमधील जखमी कर्मचाऱ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने जळगावी हलवण्यात आले होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास सर्व कर्मचारी जळगावी परतले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अहमदनगरला निघालेली पोलिस व्हॅन उलटली 
...................

Web Title: marathi news jalgaon vhyan