चारा -पाण्याअभावी पशुधन काढले विक्रीला !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पहूर (ता.जामनेर) : पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चाऱ्याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे पहूर परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. वरखेडी (ता. पाचोरा) येथील बाजारात पहूर परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीस जात आहे. पशुपालकांच्या मजबुरीचा गैरफायदा व्यापारी, दलाल घेत आहेत.

अल्प पर्जन्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला दुष्ळाळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शासनाने जामनेर तालुका टंचाईग्रस्त म्हणून घोषित केला आहे. माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जीवांचीही होरपळ वाढली आहे. पाणी टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

चाऱ्याचे भाव गगाणाला
यंदा पाण्याअभावी पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांना दूबार हंगाम घेता न आल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. विदर्भ- मराठवाडयातून दररोज मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवक वाढली आहे. तब्वल 6000 रुपयांवर चारा टेम्पोचे भाव पोहचले आहेत. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकूटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे. जिवापाड जपलेली गाई, गुरे, बैल, म्हशी चारा- पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की पशुपालकांवर आली आहे. संकटग्रस्त पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या उभारण्याची गरज अधोरेखीत होत आहे.

Web Title: marathi news jamner pashudhan tanchai