निरव मोदी परदेशात,सरकारला सहकार्य करणारे भुजबळ तुरुंगात...! 

residenational photo
residenational photo

नाशिक :  कुठलाही आरोप सिध्द होण्यापुर्वीचं अटक करून राजकीय कारकीर्द संपविण्याची भाजप सरकारने प्रथा पाडली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीतही सरकारने तेचं केलयं. भुजबळ सहकार्य करण्यास तयार असतानाही त्यांना दोषी मानून तुरूंगात टाकलयं. साडे बारा हजार कोटींचा घोटाळा करून निरव मोदी एकीकडे देश सोडून पळून जातोय तर दुसरीकडे न्यायासाठी दाद मागणाऱ्या भुजबळ यांना सरकारने तुरूंगात डांबलयं हे दुर्दव्य आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ क्‍लिपचा आधार घेवून सरकारने लढविलेली शक्कल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विधी मंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केला.

हल्लाबोल मोर्चा व नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी भवन मध्ये पत्रकार परिषद घेत सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली. यावेळी विधान परिषदेत गाजलेल्या मुंडे प्रकरणावर बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांचे चांगले काम सुरु आहे त्यामुळे व्हिडीओ क्‍लिपचा आधार घेवून त्यांना बदनाम केले जात आहे. मुंडे यांनी सभागृहात जशास तसे उत्तर देवून सरकारची बोलती बंद केली आहे. आमदार हेमंत टकले यांनी मांडलेला हक्क भंग प्रस्ताव मांडल्याने त्यातून सत्य बाहेर येईलचं.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली. केंद्र व राज्यात सरकारची सहनशिलता कमी झाली आहे. त्यामुळे विरोधात बोलले कि सुड उगवणे एवढेचं उद्योग सध्या सुरु आहे. याऐवजी सरकारने लोकांची कामे केली तर गमावलेली लोकप्रियता काही प्रमाणात मिळू शकते असा सल्ला पाटील यांनी दिला. 

सन 2007 चा मुद्दा उकरून किर्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली हा मुद्दा आताचं का उपस्थित झाला असा सवाल करताना पाटील यांनी विरोधकांना संपवण्याचाचं सरकारचा कट असल्याचा आरोप केला. कुठलीही गोष्ट सिध्द होण्याआधीचं अटक करायची हे सरकारचे धोरण आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत अगदी तसचं होतयं. भुजबळ सहकार्याला तयार असताना त्यांची तुरूंगातून सुटका होत नाही. एकीकडे करोडो रुपये बुडवून निरव मोदी परदेशात पळून जावू शकतो परंतू सहकार्याला तयार असलेल्या भुजबळ यांना तुरूंगात डांबले जाते. गेल्या तीन वर्षात भाजपच्या लोकांना अटक का केली नाही असा सवाल करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही अशाच पध्दतीने सरकारने धोरण आखले होते त्यानंतर लोकांनी दुसरे सरकार निवडून दिले. देशातही तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com