जेईई मेन्स ऑनलाईन परीक्षा आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नाशिक : इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जॉईंट एन्ट्रान्स एक्‍झाम (जेईई) मेन्सची ऑनलाईन परीक्षा उद्या (ता.15) व सोमवारी (ता.16) होणार आहे.

नाशिक : इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जॉईंट एन्ट्रान्स एक्‍झाम (जेईई) मेन्सची ऑनलाईन परीक्षा उद्या (ता.15) व सोमवारी (ता.16) होणार आहे.

यापूर्वी गेल्या रविवारी (ता.8) ऑफलाईन स्वरूपातील परीक्षा झाली होती. ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात झालेल्या परीक्षांचा निकाल एप्रिल अखेरीस होणार आहे. या निकालावर आधारीत पात्र विद्यार्थ्यांना 20 मेस होणाऱ्या जेईई ऍडवास्ड परीक्षेकरीता अर्ज सादर करता येतील. 
   जेईई परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. नामांकित संस्थांत अभियांत्रिकीसह अन्य विविध शिक्षण मिळविण्याकरीता विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जात असतात. गेल्या रविवारी (ता.8) पेन व पेपरच्या आधारे झालेल्या ऑफ लाईन परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

संगणक प्रणालीवर आधारीत ऑनलाईन परीक्षा देण्याचा पर्याय अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानुसार हा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या (ता.15) व सोमवारी (ता.16) असे दोन दिवस होणार आहे. ऑफलाईन प्रमाणे या परीक्षेकरीताही विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असून आता परीक्षेला सामोरे जाणार आहेत. संगणकीय व्यवस्था असलेल्या महाविद्यालयांत केंद्र असणार आहेत. केवळ परीक्षा देण्यापुरता ऑनलाईन व ऑफ लाईन असे पर्याय उपलब्ध करून दिले असले तरी दोन्ही परीक्षांचा निकाल एप्रिल अखेरीपर्यंत एकत्रित स्वरूपात जाहीर केला जाईल. व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर राष्ट्रीय स्तरावर गुणवारी काढत पात्र विद्यार्थ्यांना जेईई ऍडवास्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची संधी मिळेल. 
 

Web Title: marathi news jee mens online exam