नाशिक: कला दिग्दर्शक अरुण रहाणे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

नाशिक - येथील कला दिग्दर्शक व रंगकर्मी अरुण रहाणे (वय 57) यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांनी आपल्या कार्यातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने नाशिकसह राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरुण रहाणे यांनी अनेक चित्रपट, नाटक, तसेच मालिकांमध्येही कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी 3 हिंदी चित्रपटांसाह पन्नासहून अधिक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. "जत्रा', "निशाणी डावा अंगठा', "सनई चौघडे', "राजमाता जिजाऊ', "बकुळा' या चित्रपटातील काम लक्षात राहण्यासारखे आहेत. नाशिकमध्ये राहून त्यांनी उभारलेले काम उल्लेखनीय व कायम स्मरणात राहणारे आहे. ते आपल्या कर्तृत्वाने तर कला क्षेत्रात परिचित होते. सोबत मितभाषी स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.