महेश झगडेंची मंत्रालयात प्रधान सचिवपदी बदली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

नाशिक - नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रशासन-पुनर्रचनाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली. त्यांच्या विभागीय आयुक्तपदावर महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने यांची बदली करण्यात आली आहे.

झगडे यांच्या निवृत्तीला तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे; तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभागाच्या कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत नुकताच त्र्यंबकेश्‍वरचा दोनशे कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आणला आहे. डिसेंबर 2017 मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत पद्दोन्नती देण्यात आली.

Web Title: marathi news mahesh zagde nashik