चाळीसगाव : तालुक्यातील सर्वाधिक क्षमता असलेले मन्याड मृतसाठ्यात

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 4 : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मन्याड धरण अद्यापही मृतसाठ्यात आहे. 

एकूण 1 हजार 905 दशलक्ष घनफुट क्षमता असलेल्या मन्याड धरणात सद्य:स्थितीत 305 दशलक्ष घनफुट मृतसाठा शिल्लक आहे. अशी माहिती धरणाचे सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

गतवर्षी या दिवसांत धरणात मृतसाठच शिल्लक होता. मात्र, तुलनेने यंदा 2 फूट पाणीपातळी जास्त आहे. धरणातून सात गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. 4 हजार 800 हेक्टर सिंचनाखाली असून सुमारे 22 खेड्यांना फायदा होतो.

मान्यडचा वरती 22 किलोमीटर अंतरावर असलेले नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण देखील मृतसाठ्यात आहे. हे धरण भरल्यावर मान्यडला पाणी येते.

गतवर्षी धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे सिंचनासाठी दोन आवर्तने देता आली. यंदाही धरण पूर्ण क्षमतेने भरावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.