नाशिक: मध्यवर्ती कारागृहात रुद्रपूजा

जयेश सूर्यवंशी
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

जेलरोड (नाशिक) : जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिवानाच्या सुख शांतीसाठी 'आर्ट ऑफ लिविंग'च्या वैदिक धर्म संस्थान च्या वतीने श्रावण महिन्या निमित्त रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.पूजेच्या पौराहित्यासाठी खास बंगळूर येथील स्वामीजी व पंडित उपस्तिथ होते.

मध्यवर्ती कारागृहातील पदाधिकारी,कर्मचारी व शेकडो कैद्यांच्या सुखशांतीसाठी पहिल्यांदाच अश्या प्रकारची रुद्रापूजा आयोजित करण्यात आल्यामुळे सर्वानाच या पूजेची उत्सुकता होती.

या पूजेसाठी अधिकार्‍यांसह कारागृहातील शेकडो कैदी आवर्जून उपस्थित होते.यावेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी,आर्ट ऑफ लिविंग चे खंडू गांगुर्डे,अशोक गवळी,संजय पिंगळे,स्वागत देव्हारे,सचिन म्हसनें, ऋषिकेश कुलकर्णी,योगेश देवरे यांच्यासह कारागृहाच्या शासकीय कमितीवरील महिला सदस्या मंदाताई फड,कारागृहातील कर्मचारी व बंदिवान उपस्थित होते.