प्रिंटर मिळाले; पण लॅपटॉपची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नाशिक : जिल्ह्यातील तलाठ्यांसाठी शासनाने 355 प्रिंटरची सोय केली असून, दोन दिवसांपूर्वीच तलाठ्यांना त्याचे वाटपही केले. मात्र, प्रिंटर वापरासाठी आवश्‍यक असलेले लॅपटॉप मिळालेले नाहीत.

त्यामुळे स्वतःच्या लॅपटॉपने सरकारी प्रिंटरवर कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात साडेसहाशेहून अधिक लॅपटॉपची गरज असून, त्यासाठी तलाठी संघटना कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्यापही या मागणीला पूर्ण यश आलेले नाही. 

तलाठ्यांच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घ्यायला सुरवात झाली आहे. जिल्हा यंत्रणेने आलेले प्रिंटर त्याच दिवशी जिल्हाभर वाटपही केले. प्रिंटर वाटपातही ग्रामीण, दुर्गम भागातील तलाठ्यांना प्राधान्य दिले आहे. वारंवार नाशिकला येण्यात अडचणी असलेल्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, बागलाण, मालेगाव यासह दूर अंतरावरील तालुक्‍यातील तलाठ्यांना प्राधान्य देत प्रशासनाने प्रिंटर रवाना केले.

स्वातंत्र्य दिनापूर्वीच लॅपटॉपसह प्रिंटर उपलब्ध झाले असते, तर संगणकीय कामकाज सुरू होण्यास खऱ्या अर्थाने मदत शक्‍य होती.