नियमित कर्जफेड करणाऱ्यांना लाभाची मर्यादा वाढवावी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जळगाव : थकबाकीदार कर्जदारांना दीड लाखाची सुट आणि नियमीत फेड करणाऱ्यांना 25 हजार रूपये हा अन्याय आहे. शासनाने नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मर्यादेत वाढ करावी असा ठराव जिल्हा बॅंकेच्या सभेत मंजूर करण्यात आला असून शासनाकडे त्याची मागणी करण्यात येणार आहे.

बॅंकेचे कार्य चांगल्या पध्दतीने करत असल्याबद्दल संचालकांच्या कौतुकाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 

जळगाव : थकबाकीदार कर्जदारांना दीड लाखाची सुट आणि नियमीत फेड करणाऱ्यांना 25 हजार रूपये हा अन्याय आहे. शासनाने नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मर्यादेत वाढ करावी असा ठराव जिल्हा बॅंकेच्या सभेत मंजूर करण्यात आला असून शासनाकडे त्याची मागणी करण्यात येणार आहे.

बॅंकेचे कार्य चांगल्या पध्दतीने करत असल्याबद्दल संचालकांच्या कौतुकाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बॅंकेच्या आवारात घेण्यात आली. चेअरमन ऍड.रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्षस्थानी होत्या. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, तसेच सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी चेअरमन ऍड.रोहिणी खडसे यांनी बॅंकेच्या स्थितीची माहिती दिली.त्यानंतर अजेंड्यावरील विषयावर कामकाज करण्यात आले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी खासदार ए.टी.पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, नानासाहेब देशमुख,नंदू महाजन, तिलोत्तमा पाटील यांनी ठरावाचे वाचन केले, तर जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सभासदांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

कर्जमाफी मर्यादा वाढवावी 
आयत्या वेळच्या विषयातर्गंत शेतकरी सभासदांनी शासनाच्या कर्जमाफीसंदर्भात नाराजी व्यक्त केली,थकबाकीदार कर्जदारांना दीड लाखाची माफी देण्यात आली, परंतु नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना केवळ पंचविस हजार देण्यात आले आहे. हा नियमित कर्जफेड करणाऱ्यावर अन्याय आहे. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 25हजारापेक्षा अधिक रक्कम वाढविण्यात यावी असा प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिला, त्याला एकमताने मंजूरी देण्यात आली. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

जिल्हा बॅंकेतर्फे दंड, व्याज माफ 
यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले, कि कर्जमाफीसंदर्भात नियमीत कर्ज भरणाऱ्यांच्या रकमेत वाढ करावी याबाबतच्या शेतकऱ्यांच्या भावना शासनास कळविण्यात येतीलच. तसेच जिल्हा बॅंकेतर्फे कर्जवसुलीअंतर्गत जे शेतकरी कर्जमाफीच्या मर्यादेच्या बाहेर असतील त्यांनी थकबाकी भरल्यास त्यांना दंड व व्याज माफ करण्यात येईल. बॅंकेच्या वाढलेल्या ठेवी बॅंकेवरचे विश्‍वासाचे प्रतिक आहे. 

संचालकाच्या कामाचे कौतुक 
जिल्हा बॅंकेने केलेल्या प्रगतीबाबत संचालक व कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक सभासदांनी केले आहे. संचालकांना काटकसर करून बॅंकेला चांगल्या स्थितीत आणले आहे. अत्यंत कमी कर्मचारी असतांनाही त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेतल्याबद्दल संचालकांचे संभासदांनी कौतुक करून अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच कमी कर्मचारी असतानाही बॅंकेचे काम चांगल्यापध्दतीने केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. एकनाथराव खडसे यांनीही संचालक काटकसरीचे धोरण राबवून बॅंकेच्या प्रगतीत सहकार्य करीत असल्याबद्दल संचालकाचे कौतुक केले. 

पुढील महिन्यात भरतीप्रक्रिया 
जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे मत व्यक्त करून एकनाथराव खडसे म्हणाले, कि कर्मचारी भरतीला शासनाची मंजूरी मिळाली आहे. भरती प्रक्रिया एजन्सीमार्फत राबविण्यात येणार असून त्यासाठी तीन ते चार एजन्सीही तयार आहेत, त्यातील एकाची नियुक्ती त्यांच्या मार्फत पुढील महिन्यापासून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

Web Title: marathi news marathi websites Jalgaon News Farmers Loan waiver