युवकांनी ठरवावे 'युवा धोरण' : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

जळगाव : उच्च शिक्षण, नोकरी, डिजीटल शिक्षण, यासह युवकांच्या अनेक समस्या आहेत. हे प्रश्‍न युवकांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ते मांडू शकतात, त्यामुळे युवकांनीच प्रत्येक महाविद्यालयात चर्चा करून 'युवा धोरण'तयार करावे, त्यानंतर ते शासनस्तरावर पाठवावे ते राबविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांचे प्रश्‍न जाणून घेत व्यक्त केले.जळगावात तरूणाईशी त्यांनी संवाद केला. 

जळगाव : उच्च शिक्षण, नोकरी, डिजीटल शिक्षण, यासह युवकांच्या अनेक समस्या आहेत. हे प्रश्‍न युवकांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ते मांडू शकतात, त्यामुळे युवकांनीच प्रत्येक महाविद्यालयात चर्चा करून 'युवा धोरण'तयार करावे, त्यानंतर ते शासनस्तरावर पाठवावे ते राबविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांचे प्रश्‍न जाणून घेत व्यक्त केले.जळगावात तरूणाईशी त्यांनी संवाद केला. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गतर्फे जागर युवा संवाद आज जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, मांजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड.रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्कर पाटील,जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रचार्य एल.पी.देशमुख यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. युवकांनी राजकीय,सामाजिक, शेतकरी आत्महत्या,कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण याबाबत प्रश्‍न उपस्थित संवाद साधला.

त्या म्हणाल्या राज्यात युवकांचे अनेक प्रश्‍न आहेत, मात्र युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अद्याप युवा धोरणच निश्‍चित करण्यात आलेले नाही. प्रत्येक महाविद्यालयात युवक युवतीने चर्चा करून त्या प्रश्‍नाचा उहापोह करावा. युवकाचे युवा धोरण ठरविण्यासाठी युवकांची समिती स्थापन करावी. महाविद्यालयात युवा धोरण निश्‍चित झाल्यावर प्रत्येक महाविदयालयाने ते शासनस्तरावर पाठवावे. ते राबविण्यासाठी विधीमंडळ व संसदेत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. 

यशवंतरावाची ओळख व्हावी 
युवकांशी संवाद साधत असतांना त्यांनी राज्याचे पहिले पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात काही प्रश्‍न विचारले त्यावेळी युवकांमधून माहिती मिळाली नाही, त्याबाबत बोलतांना ते म्हणाले,राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत नवीन पिढीला काहीही माहिती नसणे हे दुर्देव आहे, परंतु अगोदरच्या पिढीचे अपयश आहे. नवीन पिढीला त्यांच्या ओळख असण्याची गरज आहे, इतिहास हा नवीन पिढीला कळलाच पाहिजे तो जगण्यासाठी त्याची गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला त्याची माहिती देण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जळगावात महाविद्यालयात त्यांच्या जीवनावर व्याखान आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

तंत्रज्ञानात बदलाची गरज 
राज्यात डिजीटलचा गवागवा केला जात असला तरी राज्यसरकार त्या तंत्रज्ञानात पूर्णपणे अपयशी झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाईन फार्म करून घेतांना शेतकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे न उमटने हे तत्रज्ञानाचे अपयश आहे. मुबंई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणी वेळेवर न होणे हेसुध्दा अपयशच आहे. जर तेवढाच खर्च शिक्षकावर केला असतात तर त्यांनी दुप्पट पेपर तपासले असते. त्यामुळे राज्यातील तंत्रज्ञानानही आपल्या बदलण्याची गरज आहे. 

लोकसभेत अंपगाना प्रतिनिधीत्व मिळावे 
लक्ष्मी शिंदे या अपंग युवतीने राज्यात कलावंत, क्रिडापटू यांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व दिले जाते. परंतु अपंगाना का प्रतिनिधीत्व दिले जात नाही?असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना खासदार सुळे म्हणाल्या, ही सूचना खरोखरच चांगली आहे, राष्ट्रपतीना राज्यसभा सदस्य नियुक्तीचे अधिकारातर्गत एका अपंग सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत आपण त्यांना पत्र देणार आहोत. यावेळी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. पियुष नरेंद्र पाटील, पल्लवी शिंपी या युवतीने प्रारंभी मनोगत व्यक्त केले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.