लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नाशिक : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारही केला आणि लग्नाच्या परवानगीसाठी  घरी गेले असता, त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे संशयिताविरोधात बलात्कारासह त्याचे वडील व बहिणीविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 
 
 पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित चेतन महाजन याने फेसबुकच्या माध्यमातून पीडित युवतीची ओळख झाली. सतत संपर्कात राहिल्यानंतर जवळीक साधून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखविले आणि शरीर सुखाच्या तिच्या नकारानंतरही बळजबरीने संशतियाने बलात्कार केला. तर, लग्नाच्या परवानगीसाठी पीडित युवतीला घेऊन संशयित त्याच्या धरणगाव (जि. जळगाव) येथे घेऊन गेला.

     त्याचे वडील व बहिणीने विरोध करीत पीडित युवतीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, संशयिताच्या वडलांनी तिला मारून टाकण्याची धमकीही दिली. सदरचा प्रकार गेल्या जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान श्री गुरुजी रुग्णालयाच्या पाठीमागील निलेश पार्कमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिसात बलात्कार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 कलमान्वये तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 
 
Web Title: marathi news married life rape