माजी आमदार साहेबराव पाटील भाजपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

जळगाव - 'एकच वादा..अजितदादा' अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कायम घोषणा देणारे आणि त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे अमळनेर (जि. जळगाव) चे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पाटील यांनीच भाजपचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांना राष्ट्रवादीत आणले, परंतु आज ते स्वत: मात्र भाजपात गेले आहेत. 

माजी आमदार साहेबराव पाटील हे गेल्या पंचवार्षिक निवडणूक अपक्ष आमदार झाले होते. त्यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठींबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते समर्थक आमदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटचे मानले जात असत. त्यामुळेच अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे धरणास सर्वात जास्त निधी आपणास अजित पवारांनी दिला असल्याचा दावाही ते नेहमी करीत असत. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत अमळनेर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र ते पराभूत झाले. अमळनेर पालिका निवडणूकीत त्यांनी भाजपतून राष्ट्रवादीत आलेले जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने आघाडी केली होती. भाजपा तसेच अपक्ष आमदार शिरीश पाटील यांच्या आघाडीचा पराभव करून त्यांनी अमळनेरची पालिका ताब्यात घेतली. त्यांच्या पत्नी पुष्पलता पाटील थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या. परंतु कालांतरांनी त्यांनी अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला. 

साहेबराव पाटील यांनी आज अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत शिवसेनेचे अनिल अंबर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन पाटील, काँग्रेसचे रामभाऊ संदानशिव, धीरज अग्रवाल यांनीही भाजपात प्रवेश केला. त्याचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे अमळनेरच्या राजकारणाला काय कलाटणी मिळणार याकडेच लक्ष आहे. 

Web Title: marathi news mla sahebrao patil enters in bjp