करवाढी विरोधात सर्वपक्षीय मोर्चाची तयारी 

residenational photo
residenational photo

नाशिक : महापालिकेच्या इतिराहासातील सर्वाधिक करवाढ केल्यानंतर नाशिककरांमध्ये निर्माण झालेल्या संतापाला मोकळी वाट करून देण्यासाठी व सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेने आंदोलनाचा धडाका लावला असताना स्वतंत्ररित्या आंदोलनानंतर भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून पुढील आठवड्यात भव्य मोर्चाच्या माध्यमातून विरोधकांची एकजुट पाहायला मिळणार आहे. 
मंगळवारी झालेल्या महासभेत निवासी, अनिवासी व औद्योगिक दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शहराच्या विविध भागामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटतं आहे. शिवसेनेने सभागृहात व रामायण समोर करवाढी विरोधात आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुध्दा विभागिय कार्यालयांवर आजपासून मोर्चांचे आयोजन केले आहे. मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्षाने घोषणाबाजी तर आज कॉंग्रेसच्या चार तासांच्या धरणे आंदोलनाने शहरात करवाढी विरोधात वातावरण निर्मिती झाली आहे. यापुर्वी सन 2014 मध्ये मराठवाड्याला गंगापूर धरणातून पाणी सोडल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करून सत्ताधारी भाजपच्या नाकेनऊ आणले होते त्याच धर्तीवर आता करवाढीला विरोध करण्यासाठी भाजप वगळता सर्व पक्षांचा एकत्रित मोर्चा महापालिकेवर काढला जाणार असून त्याचे नियोजन सुरु आहे. 

कायदेशीर सल्ल्याची तयारी 
स्थायी समितीने करवाढीचे समर्थन केले असले तरी ती करवाढ फक्त अठरा टक्के होती. परंतू प्रशासनाने स्थायी समितीचे नाव पुढे करून निवासी 33, अनिवासी 64 तर औद्योगिक क्षेत्रातील मालमत्तांसाठी 82 टक्के करवाढ मंजुर करून घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्तावाचे समर्थन करताना स्थायी समितीने महासभेकडे पाठविलेल्या प्रस्तावात बदल करण्याचा अधिकार असल्याने तो अधिकार वापरल्याचे सांगितले होते. परंतू कर व दराचे अधिकार असलेली स्थायी समिती सर्वोच्च असल्याने प्रस्तावात बदल करायचा तर पुन्हा स्थायी समितीकडे पाठवून मंजुरी घेणे आवशक्‍य होते. स्थायी समितीच्या प्रस्तावात बदल करण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का? याबाबत कायदेशीर बाबी भाजपच्या नगरसेवकांकडून तपासले जात असून या मुद्यावर विरोधकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. आयुक्त त्यांच्या अधिकारात प्रस्तावात बदल करणार असतील तर सत्तेचा काय उपयोग या भावनेतून भाजपचे नगरसेवक आयुक्तांच्या भुमिकेविरोधात सरसावले आहेत. 
 
शिवसेनेचे ढोल बजाव 
करवाढी विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेने विभागिय कार्यालयांवर ढोल बजाव आंदोलन केले जाणार आहे. शहरभर प्रचार वाहनातून सरकारच्या नाशिक विरोधातील धोरणांची माहिती दिली जाणार असून आश्‍वासनांचे गाजर हा महत्वाचा मुद्दा त्यात राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com