आ. सीमा हिरेंच्या वाहनाला किरकोळ अपघात

Seema-hire
Seema-hire

नाशिक : मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या वाहनाला कसाऱ्यानजिक अपघात झाला. क्रिकेट खेळणाऱ्या युवकांच्या चारचाकी वाहनाने आमदार हिरे यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी ते युवक बॅट-स्टंप घेऊन आमदार हिरे यांच्यासह चालकांवर धावून गेले. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षकाने पिस्तुल रोखल्याने पुढचा प्रसंग टळला. परंतु त्यानंतर कसारा पोलिसात प्रकरण गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आमदार सीमा हिरे व त्यांची कन्या रश्‍मी या मुंबईत भरविण्यात आलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रदर्शनाला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या. समवेत सुरक्षारक्षकही होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटाच्या पुढे निघाले असता, त्यांच्या वाहनाला पाठीमागून चारचाकी वाहनाने धक्का दिला. चारचाकी वाहनांमध्ये क्रिकेट खेळणारे कसाऱ्यातीलच काही युवक होते. त्यांनी अपघातानंतर आमदार हिरे यांच्या चालकावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार हिरे यांनी युवकांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असता, युवकांची अरेरावी वाढत जाऊन ते बॅट व स्टंप घेऊन धावून आले. त्यावेळी उपस्थित सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर पिस्तुल रोखल्याने पुढील प्रसंग टळला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच कसारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

संबंधित युवकांना ताब्यात घेत कसारा पोलिसात गेल्यानंतर, त्यांना त्यांच्या चुकीची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर वाद विकोपाला न जाता मिटविण्यात आला. मात्र कसारा पोलिसात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी कोणतीही तक्रार कसारा पोलिसात दाखल नसून आमदार सीमा हिरे यांनी मुंबईकडे जाणे टाळत परत नाशिककडे माघारी परत आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com