मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधातील ग्रामसेवक सामुहिक रजेवर  

संजीव निकम
सोमवार, 22 जानेवारी 2018

नांदगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कार्यपद्धती विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवीत तालुक्यातील ग्रामसेवकांनी सामुहिक रजेवर जात येथील प्रशासकीय संकुलाबाहेर आज धरणे आंदोलने केली गेल्या पाच दिवसापासून ग्रामसेवकांचे आंदोलन सुरु असून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात दिवसभरासाठी धरणे देऊन आपल्या विविध प्रलंबित मागणीसाठी यापेक्षा अधिक तीव्रतेने हा लढा चालूच ठेवण्याचा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरोदे, सरचिटणीस रवींद्र पाटील, उपाध्यक्ष किरण घुगे यांनी दिला.

या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी सर्व ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी जगणराव सूर्यवंशी भेट घेता सामुहिक रजेवर जात असल्याबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. त्यांनंतर पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे धरले. यानंतर आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिक येथे जिल्हापरिषदेच्या मुख्यालयापुढे धरणे आंदोलन होणार असून त्यात जिल्हाभरातील ग्रामसेवक त्यात सहभागी होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिली राजेंद्र थोरात, अतुल सोनवणे, निलेश पुराणिक, सरला राठोड, स्मिता गडाख, गोकुळ खैरनार, मिलिंद सोनवणे, चतुर शिरसाठ, रामदास मोरे, प्रमोद महाले, बिरू गेंद, पावन थोरात, रवींद्र शेलार, भगवान जाधव, संजय सैंदाणे, युवराज निकम, पावन वाघ, अतुल आहिरे, बबन राठोड, संजय फलके, प्रवीण सांगळे, सुनील मोकळं, नंदकिशोर अमृतकर, गजानन कुव्हेरे, प्रशांत पाटील, शरद मोहिते, संतोष काकळीज, चंद्रकांत जगताप, सरला आढाव, दिलीप निकम, आर. टी. कदम, अमोल धात्रक आदी विविध ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आजच्या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे रमेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे यांनी धरणे आंदोलनकर्त्या ग्रामसेवकांची भेट घेत आपली सहानुभूती दर्शविली तर तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी भेट देऊन ग्रामसेवकांचे निवेदन स्वीकारले.
 
Web Title: Marathi news nandgav news agitation