नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यात युरोपच्या "गुलाबी मैना'चे आगमन 

live photo
live photo

नाशिकः नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात युरोपमधील "गुलाबी मैना'चे आगमन झाले आहे. शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असलेल्या या पाच हजारांहून अधिक पक्ष्यांचा विहार पर्यटकांना मोहित करीत आहे. 

गुलाबी मैना. अर्थात, पळस मैना. हिवाळ्यात पळस बहरताच त्याच्यावर मोठ्या संख्येने जो पक्षी आढळतो तो म्हणजे गुलाबी मैना. हा पक्षी पूर्व युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून आपल्याकडे येतो. 
हा पक्षी समूहाने राहतो. पिकांवरील कीड खाण्याचे काम करत असल्याने शेतकरी या पक्ष्याची जणू वाटच पाहत असतात. गुलाबी रंगाच्या पक्ष्याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची आहे. त्याच्या डोक्‍याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते. हिवाळ्यात स्थलांतर करून जुलै-ऑगस्टमध्ये हे पक्षी देशात येतात. 
खुल्या शेतापासून ते निमवाळवंटी प्रदेश हे गुलाबी मैनेचे आवडते ठिकाण आहे. शेतातील कीटक, वड-पिंपळ वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलातील मध हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. हे पक्षी सात ते आठ महिने देशात राहतात.

यंदा नाशिकमध्ये दहा हजारांहून अधिक पक्षी दाखल झाले आहेत. सायंकाळी हे पक्षी एकत्र येतात, त्या वेळी आकाशातील त्यांचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडतात. अवकाशात एका वेळेस विविध आकृत्या तयार करतात. ते पाहण्यासाठी सायंकाळी नाशिककर घराबाहेर पडतात आणि पर्यटक नांदूरमध्यमेश्‍वरच्या अभयारण्यात जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com