धुळे : राष्ट्रवादी महिला काँग्रेस देणार मोदी, जेटलींना नॅपकिन्सची भेट

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 13 जून 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सॅनिटरी नॅपकिन्सची भेट दिली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटी करप्रणालीतून वगळल गेले नाहीत. याचा निषेध म्हणून संतप्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हा निर्णय घेतला आहे.

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सॅनिटरी नॅपकिन्सची भेट दिली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटी करप्रणालीतून वगळल गेले नाहीत. याचा निषेध म्हणून संतप्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हा निर्णय घेतला आहे.

या आधीही सॅनिटरी नॅपकिन्स वरील जीएसटी कर रद्द व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रदेशाध्यक्षा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटीत मागणीचे निवेदन दिले होते. त्यावेळी युती सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवरील कर रद्द करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांना विनंती करू, असे आश्वासन दिले होते. त्यावर राज्य सरकारतर्फे कोणतीही कृती करण्यात आली नाही. स्त्रियांच्या आरोग्याबाबत सरकार असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते, असे सांगत सॅनिटरी नॅपकिन्सवरील कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी दिला.