नाशिक : चांदवडचे मुख्याधिकारी व अभियंत्यांची होणार चौकशी

दिपक निकम
बुधवार, 14 जून 2017

चांदवड (जि. नाशिक) : चांदवड नगरपरिषदेने माहिती अधिकार तसेच इतर तक्रारी अर्जांच्या बाबतीत दिरंगाई करत अर्जदाराची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन अधिकारी एम.बी. खोडके यांनी तत्कालिन मुख्याधिकारी राहुल वाघ व बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी यांच्या चौकशीचे आदेश चांदवड नगरपरिषदेला दिले आहेत.

येथील रहिवाशी उदय वायकोळे यांनी महालक्ष्मी नगरातील भूखंडाविषयी माहिती अधिकारात मागितलेली माहिती बांधकाम अभियंता यांनी दिली. मात्र, ती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करीत वायकोळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याच तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी खोडके यांनी चांदवड नगरपरिषदेला पत्र काढत तत्कालिन मुख्याधिकारी वाघ व बांधकाम अभियंता फुलारी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान अर्जदार वायकोळे हे ऑक्‍टोबर पासून संबंधित प्रकरणाबाबत नगरपरिषदेच्या खेट्या मारत अर्ज फाटे करीत आहेत. मात्र प्रत्येकवेळी नगरपरिषद प्रशासनाकडून वेळ मारून नेण्यात आल्याने उजाडले तरीही अर्जदार वायकोळे न्यायाच्याच प्रतिक्षेत असल्याने हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे चांदवडकरांचे लक्ष लागून आहे.