लाभार्थ्यानेच ९९ वर्षांच्या कराराने परस्पर विकले घरकुल

home
home

येवला : इंदिरा आवास योजनेंतर्गत मिळालेले शासकीय घरकुल कोणतीही परवानगी न घेता मूळ लाभार्थ्याने अनधिकृतपणे ५ हजार रुपयांना ९९ वर्षाचा करारनामा करुन वास्तव्यासाठी विकले आहे. आता हाच लाभार्थी तक्रारी करू लागल्याने हे वास्तव पुढे आले आहे. या प्रकाराला ग्रामसेवकाने दुजोरा दिला आहे.

कानडी येथील ज्ञानदेव खुरसने यांना सुमारे पंधरा वर्षापूर्वी शासकीय योजनेतून महसुली घरकुलाचा लाभ देण्यात आला होता. काही वर्ष या घरकुलात राहिल्यानंतर हे दांपत्य स्वत:च्या शेतात राहायला गेले.या घरकुलाची खुरसणे कुटूंबाला आवश्यकता संपल्याने खुरसणे यांनी या घरकुलाची दिनांक २७ जुलै २००८ रोजी प्रतिज्ञापत्रान्वये प्रकाश झेंडे यांना अनधिकृतपणे ५ हजार रुपयांना ९९ वर्षाचा करारनामा करुन वास्तव्यासाठी विकले. हा दस्त कार्यकारी दंडाधिकारी येवला यांच्या समोर करण्यात आला असून करारनाम्यावर लिहून घेणार व देणार या दोघांच्याही स्वाक्षर्याद आहेत. आम्हाला आमच्या शेतजमिनीमध्ये रहाण्यास कोपी असल्याने आम्ही स्वखुशीने मिळकत वास्तव्यासाठी दिली आहे.असे यात म्हटले आहे.

आता खुरसणे कुटूंबाला घराची गरज भासू लागताच त्यांनी कुभांड रचून बेकायदेशीर प्रकार करूनही ग्रामसेवकानंच घर भाड्याने दिल्याची तक्रार प्रसार माध्यमांकडे केली आहे. २००८ ते २०१७ दरम्यान खुरसने हे स्वत: या घरकुलाची घरपट्टी भरत आहेत. असे असताना त्यांनी १० वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतके सगळे होऊनही खुरसने यांनी गटविकास अधिकारी येवला यांच्याकडे ग्रामसेवकाची खोटी तक्रार केली असून ग्रामसेवकावर दबाव आणण्याचा व ग्रामसेवकाची बदनामी करण्याचा प्रकार समोर आल्याचे दिसून येत आहे.

“कानडी येथील शासकीय घरकुल भाडयाने देण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. तक्रारदार खुरसणे यांच्या अतिक्रमण संदर्भातील अर्जाची चौकशी केली असता तक्रारदार खुरसणे यांनी २००८ साली ९९ वर्षाच्या कराराने ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेऊन घरकुलाची परस्पर अनधिकृतपणे विक्री केली होती. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराकडून कारवाईच्या भीतीपोटी खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. 
- गोपीचंद खैरे, ग्रामसेवक कानडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com