कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनीच नाशिकच्या महापौरांनी वाहिली श्रध्दांजली

nashik
nashik

नाशिक : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर म्हणजे समस्त मराठी भाषिकांचा अभिमान. त्यांचा वाढदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणुन पाळला जातो. मात्र त्यांच्या जयंतीदिनीच महापौरांनी आज त्यांना श्रध्दांजली वाहिली. ही चूक त्यांच्या लक्षात आणुन दिल्यावरही त्या निग्रहाने पुढे बोलत राहिल्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावीच सकाळी आठला होणारा कार्यक्रम अकराला झाला. त्यानंतर शहराच्या प्रथम नागरीकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिल्याने आजचा कार्यक्रम काहीसा वेदनादायीच ठरला. 

कुसुमाग्रजांचा जयंतीदिनी त्यांचे निवासस्थान राहिलेल्या वास्तुत दरवर्षी कुुसमाग्रज प्रतिष्ठाणकडुन सकाळी आठला दरवर्षी सकाळी आठला होतो. मात्र, महापौरांना अन्य कार्यक्रम असल्याने त्यांनी सकाळी आठ ऐवजी अकराला उपस्थित राहू अशी पूर्वसुचना दिली होती. सकाळी आठाल येथे अन्य कोणीही महत्वाचे पदाधिकारी नसल्याने काहीसा शुकशुकटाच होता. अकराला कार्यक्रम झाला मात्र अपवाद वगळता महत्वाचे पदाधिकारीच नव्हते. महापौरांनी यावेळी ''जयंती दिनानिमित्त मी श्रध्दांजली अर्पण करते. हा कार्यक्रम दरवर्षी साजरो होतो. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.'' असे प्रतिपादन केले. 

यावेळी उपस्थितांनी त्यांना आज कुसुमाग्रजांची जयंती आहे. तुम्ही त्यांना श्रध्दाजली वाहत आहात ही चूक लक्षात आणुन दिली. त्यावर त्या अजिबात न अडखळता, "जयंती असली तरी असु देत. कुसुमाग्रजांना आपण मराठी भाषेचे शिल्पकार मानलेले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम झाला आहे. महापालिकेतर्फे व सर्व शहराच्या वतीने आपण सर्व त्यात सहभागी होऊ'', असे महापौर म्हणाल्या.

भाजप हा मराठी भाषकांचा केवळ मतांसाठी वापर करुन घेतो. त्यानंतर मात्र विसरतो. आजचा कार्यक्रम त्याचेच उदाहरण असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. तर काँग्रेसच्या प्रवक्‍त्या आणि महापालिका सभापति डॉ. हेमलता पाटील यांनी "आजच्या कार्यक्रमाला कोणीही महत्वाचे पदाधिकारी नाहीत. महापालिकेने कार्यक्रम केले नाहीत. मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम तसेच शाळांमध्ये कार्यक्रम करण्याची संधी होती. ती महापालिकेने दवडली.'' अशी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कवी कुसुमाग्रजांना अभिवादन केले. योवळी शहराध्यक्ष नगरसेवक अनिल मटाले, प्रदेश उपाध्यक्ष राहूल ढिकले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com