लांब-मध्यम पल्ल्याच्या एसटीला प्रशासनाचा 'ब्रेक' 

नरेंद्र जोशी
रविवार, 30 जुलै 2017

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या बसला साठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवासी मिळत असतील, तर त्या बसेस तातडीने बंद करा, असे स्पष्ट आदेश राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे लांब व मध्यम पल्ल्यांच्या गाड्यांना महिनाभरात किती प्रवासी मिळाले? याची गणना सुरू झाली आहे. 

नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, शेगाव, सातारा, अलिबाग, रायगड, नगर, नागपूर येथून सर्वत्र लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. बऱ्याचदा बसमध्ये प्रवासी पुरेसे नसले तरी बस सोडली जाते. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे व्रत घेतल्याने महामंडळाने आजपर्यंत कधी फायदा-तोट्याचा विचार केला नाही. आता मात्र खर्चात बचत करण्यासाठी साठ टक्के (भारमान) प्रवासीही मिळत नसल्यास त्या मार्गावरील बस फेऱ्या तातडीने कमी करा. फक्त प्रवाशांची तक्रार उद्‌भवणार नाही. याची दक्षता घ्या, असे आदेशात म्हटले आहे. 

सहा हजार बसफेऱ्या बंद होणार या निर्णयामुळे राज्यभरातील लांब व मध्यम पल्ल्याच्या तब्बल सहा हजार बसेसच्या फेऱ्या बंद करण्याची वेळ येणार आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम नसल्याने या बस तूर्त बंद झाल्या तरी प्रवाशांची फारशी ओरड होणार नाही. उन्हाळा, दिवाळीच्या सुट्या लागतील तसेच यात्रा, उत्सव, लग्नसराई सुरू होईल, त्या वेळेस या बंद बसची झळ सोसावी लागेल.