मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे आज 'पंचवटी'सह विविध गाड्या रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नाशिक : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकावर उद्या (ता. 25) सहा तासांचा, तर अंबरनाथ स्थानकावर साडेचार तासांचा मेगा ब्लॉक असल्याने पंचवटी एक्‍स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक दूरपल्याच्या गाड्या मुंबईऐवजी कल्याण आणि नाशिक रोडहून वळविल्या जाणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबापुरी गाठण्यासाठी प्रवाशांना एसटीचा पर्याय वापरावा लागणार आहे. 

नाशिक : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकावर उद्या (ता. 25) सहा तासांचा, तर अंबरनाथ स्थानकावर साडेचार तासांचा मेगा ब्लॉक असल्याने पंचवटी एक्‍स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक दूरपल्याच्या गाड्या मुंबईऐवजी कल्याण आणि नाशिक रोडहून वळविल्या जाणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबापुरी गाठण्यासाठी प्रवाशांना एसटीचा पर्याय वापरावा लागणार आहे. 

ठाकुर्ली स्थानकावर रविवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी सव्वातीन तर अंबरनाथ-बदलापूरदरम्यान साडेचार तासांचा मेगा ब्लॉक दुरुस्ती कामासाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्‍स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड गोदावरी एक्‍स्प्रेस धावणार नाहीत. दुपारी बाराला छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोचणारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्‍स्प्रेस नाशिक रोड स्थानकापर्यंतच धावेल. सकाळी साडेसातहून ती परतीला रवाना होईल. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून दुपारी तीनला पोचणारी मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्‍स्प्रेस नाशिक रोड स्थानकातून सायंकाळी साडेसहाला सुटेल. 

कल्याणला फिरणाऱ्या रेल्वेगाड्या 
नाशिक रोडहून मुंबईला जाणाऱ्या मेल आणि एक्‍स्प्रेस रेल्वेगाड्या कल्याण स्थानकापूर्वीच नियंत्रित होतील. त्यात हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई एक्‍स्प्रेस ही रेल्वेगाडी सकाळी सव्वाअकराला शिवार्जी टर्मिनन्सहून सुटण्याऐवजी दुपारी दोनला कल्याणहून सुटेल. राजेंद्रनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस कुर्ला स्थानकात सकाळी साडेअकराऐवजी कल्याणला दुपारी दोनला पोचेल. गोरखपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई विशेष एक्‍स्प्रेस मुंबईत सव्वा बाराऐवजी कल्याणला दुपारी सव्वादोनला, अलाहाबाद लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्प्रेस सव्वाबाराऐवजी पाऊणला, तर वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस दुपारी सव्वाबाराऐवजी दुपारी पावणेदोनला पोचेल. 

दूरपल्ल्याच्या गाड्यांत बदल 
याशिवाय जालना-दादर जनशताब्दी एक्‍स्प्रेस साडेबाराऐवजी दुपारी तीनला, हटिया लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस दुपारी सव्वाऐवजी साडेतीनला, वाराणसी-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई महानगरी एक्‍स्प्रेस दुपारी सव्वा दोनऐवजी पावणेचारला, अलाहाबाद लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्‍स्प्रेस दुपारी दीडऐवजी पावणेचारला, पाटलीपुत्र लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस दुपारी दीडऐवजी चारला पोचेल.