नांदगाव पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने केले शिलकी अंदाजपत्रक मंजूर 

representational image
representational image

नांदगाव : कुठल्याही प्रकारची करवाढ नसलेल्या पंचवीस लाख ६७ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीपुढे समोर पालिका अर्थसंकल्पाचे प्रारूप ठरविण्यात आले होते. त्यांनतर नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सर्व पक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीतलं सर्वसाधारण सभेने या अर्थसंकल्पाला मान्यता दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेसाठी अर्थसंकल्प मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नव्याने कुठल्याही करवाढ सुचविण्यात आलेली नसल्याने नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. महसुली व भांडवली जमा बाजूने ३७ कोटी ८५ लाख ८० हजार १७६ रुपये च्या या नव्या अर्थसंकल्पात नागरी सुविधा विकास व आस्थापनेवरच्या खर्चाच्या तरदुतीसह चालू आर्थिक वर्षात ३७ कोटी २० लाख १२ हजार९८५ रुपयांच्या खराचाचि तरतूद गृहीत धरण्यात आली आहे

त्यामुळे सध्याच्या अर्थसंकल्पीय शिलकी बाजूस २५ लाख ६७ हजार १९१ रुपये राहिले आहेत . शहरातील सार्वजनिक विकासकामासाठी शासनांकडून व इतर माध्यमातून मिळणारे अनुदाने,अंशदान यापोटी पालिकेच्या कामकाजाचा गाडा चालविला जात असतो कर महसूल, अभिहस्तांकित महसूल अनुदाने स्थावर मिळकतीपोटी जमा होणारे भाडे, आदी विविध स्वरूपातील महसुली जमा बाजूला ६ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये अपेक्षित असून त्यातून आस्थापना व प्रशासकीय खर्च, व्यहवा इतर वित्तीय आकार व्यवहार,कार्यक्रम अंमलबजावणी करिता होणार खर्च महसुली अनुदाने अंशदान आदी शीर्षाखाली जवळपास १२ कोटी २० लाख ३७ हजार ९८५ रुपये खर्चापोटी गृहीत धरण्यात आली.

महसूली जमाबाजू व्यतिरिक्त अर्थसंकल्पातील तरदुती पुढील प्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात विशिष्ट प्रययोजनाकरिता मिळणारी अनुदाने,अंशदान सुरक्षित व असुरक्षित कर्जे प्राप्त ठेवी व इतर दायित्व या माध्यमातून भांडवली जमा बाजूला २४ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपये गृहीत धरण्यात आली आहेत.

याच भांडवली खर्चाच्या बाजूने २४ कोटी ९९ लोक ७५ हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष राजेश कवडे,उपनगराध्यक्षा सौ कामिनी साळवे,यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी सर्वपक्षीय नगरसेवक या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. मुख्याधिकारी व्ही बी दातीर, प्रभारी लेखापाल दीपक बांगळ, अनिल बुरकूल, अनिल पाटील विजय कायस्थ यांनी अर्थसंकल्पीय कामकाजाला सहायय केले 

नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त करांचा बोजा टाकलेला नाही विकासकामांना चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत जनतेने सहकार्य करावे 
- राजेश कवडे, नगराध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com