नाट्य परिषदेचे लेखन, रंगकर्मी, नाट्यकर्मी पुरस्कार जाहीर 

नाट्य परिषदेचे लेखन, रंगकर्मी, नाट्यकर्मी पुरस्कार जाहीर 

नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांना, तर प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी हेमंत टकले यांना जाहीर झाला असून, अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मे महिन्यात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कदम म्हणाले, की दर दोन वर्षांनी वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, शं. ना. नवरे, सतीश आळेकर, प्रेमानंद गज्वी, आशोक पाटोळे, मधुकर तोरडमल, जयंत पवार यांना दिलेला आहे. प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार श्रीराम लागू, मोहन वाघ, विजया मेहता, पुरुषोत्तम बेर्डे, सुलभा देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर, रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र दाते, विक्रम गोखले, प्रशांत दामले, अशोक सराफ यांना देण्यात आला आहे. बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार हा स्थानिक नाट्यकर्मींना दिला जातो. यापूर्वी तो नेताजी भोईर आणि सुषमा अभ्यंकर यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com