रिमझिम पावसाने गारठले नाशिककर

nashik
nashik

नाशिक : ओखी वादळाच्या प्रभावामुळे पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली असताना गार वाऱ्याची झुळूक वाहू लागल्याने नाशिककर गारठले आहेत.

अवकाळी पाऊस आणि अधिकच्या आर्द्रतेमुळे द्राक्ष, भाजीपाला, कांद्याच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता अधिक आहे. गारठ्यामुळे सकाळपासून उबदार कपडे परिधान करावे लागल्याने नाशिककर जम्मू-काश्‍मिरचा फील घेताहेत.

तरसाळी, मालेगाव, सटाणा, कळवण, ब्राह्मणगाव, नांदगाव, सुरगाणा, पांढुर्ली या भागामध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत आहेत. उद्यापर्यंत (ता. 6) ढगाळ हवामान आणि पावसाची स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com