मुस्लिम तरुणांकडून 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष

nashik
nashik

वणी (नाशिक) : सर्व धर्म समभावाची शिकवण देवून हिंदु-मुस्लिम असा भेदभाव विसरुन महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळी ओळख शिवरायांनी प्राप्त करुन दिली. याचाच प्रत्यय आज वणी, ता. दिंडोरी येथे दिसून आला. आज येथूल मुस्लिम पंच कमिटी व नुराणी फ्रेंड सर्कलच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी केली.

येथील भाजी मंडईतील जामा मशीद समोर उभारलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासह राजश्री शाहु महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा परीषद सदस्या छायाताई गोतरणे, सरपंच सुनिता भरसट, उपसरपंच विलास कड, आबासाहेब देशमुख, रविकुमार सोनवणे, किरण गांगुर्डे, बाळासाहेब गांगुर्डे,  डॉ. मधुकर आचार्य, डॉ. भवर, सार्वजनिक शिवजंयतीचे पदाधिकारी आदींसह गावातील जेष्ठ नागरीक तसेच मुस्लिम पंच कमिटीचे बब्बु शेख, जमिर शेख, समिम शेख, बंटी सैय्यद, शौकत मनियार, गब्बर मनियार, एजाज पठाण, अॅड. पठाण, असिफ शेक, मुजीब शेख, नवाज शेख आदी हिंदु-मुस्लिम बांधवानी एकत्रीत करीत सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले.

तसेच गावातील सार्वजनिक शिवजंयती उत्सव समिती व विविध संस्थाच्यावतीने आयोजित केलेल्या शिवजंयती उत्सव कार्यक्रम, मोटरसायकल रॅली व मिरवणूकीतही मुस्लिम तरुणांनी सहभाग होवून हातात भगवे घेत 'जय भवानी, जय शिवाजी' , 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करीत एकात्मतेचा संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com