पैठणी केंद्राच्या उद्घाटनासाठी आलेल्या श्रीदेवीच्या आठवणीत रमले येवलेकर

yeola
yeola

येवला : तब्बल साडेपाच पाच फूट उंचीची धडकन गर्ल साडे तीन लाख रुपये किंमतीची प्युअर ब्राँकेट या प्रकारातील पैठणी परिधान करून रॅम्पवर अवतरली होती पैठणी शो मध्ये...बाहेर धोधो पाऊस बरसत होता. मात्र या पावसाला न जुमानता येवलेकर मोठ्या आनंदाने हवाहवाईला पाहण्यासाठी अंगणगाव च्या पर्यटन केंद्रांवर जमले होते...
तो दिवस होता २२ आगस २०१४ आणि निमित्त होते तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येथे राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळातर्फे साकारलेल्या ग्रामीण पर्यटन माहिती पैठणी प्रोत्साहन केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचे....

जवळपास चार वर्षांपूर्वीचा हा प्रसंग...मात्र आज सकाळी सकाळी जेव्हा श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावरून समजले तेव्हा येवलेकरांना गहिवरून आले आणि आठवण झाली या दिवसाची... तसे तर श्रीदेवीसारखी राष्ट्रीय स्तरावरील नायिका येवल्या सारख्या दुष्काळी गावात येईल कशाला.. मात्र येथील कारागिरांच्या कलेला दाद देऊन तिचा राष्ट्रीय स्तरावर गौरव हवा यासाठी भुजबळांच्या प्रयत्नातून श्रीदेवी येथे आल्या होत्या. आठ कोटी 78 लाख रुपयांच्या या केंद्राच्या उद्घाटनावेळी पैठणीची भुरळ खुद्द हवाहवाईला पडली होती.पती व प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासमवेत आलेल्या श्रीदेवी यांनी परेट ग्रीन रंगातील कडियल पैठणी परिधान करून या पैठणी केंद्राचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पतीसोबत आख्खे पर्यटन केंद्र न्याहाळत पैठणी साडी विषयी सगळा इतिहास भुजबळांसह काही उपस्थित विणकरांकडून समजून घेतला होता.पैठणी विषयी खूप काही ऐकले होते मात्र आज प्रत्यक्षात ती पाहण्याचा आणि नेसण्याचा योग आल्याचा आनंद या वेळी त्यांनी बोलून दाखवला होता.

उद्घाटन सोहळ्यानंतर त्या ठिकाणी आयोजित पैठणीच्या फॅशन शोच्या रॅम्पवर श्रीदेवीने परिधान केलेली पैठणी साडी आणि सादर केलेला देखन्या रॅम्प वॉकने येवलेकरांना चांगलीच मोहिनी घातली होती. साडेपाच फूट उंचीची श्रीदेवी साडे तीन लाख रुपये किमतीची प्युअर ब्राँकेट या प्रकारातील नक्षीदार फुलांची मोतीया रंगाची पैठणी नेसून रॅम्पवर अवतरली  तेव्हा सर्वांचेच डोळे श्रीदेवीवर खिळले होते.

वर्षानुवर्ष फक्त चित्रपटातून आणि टीव्ही वरतीच दिसणारी ही भोळीभाबडी देखणी नायिका साक्षात समोर असल्याचे पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला होता...

झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेतील स्टार नाईका त्यांच्यासोबत रॅम्पवर होत्या मात्र येवलेकरांना यापेक्षा अधिक भुरळ होती ती श्रीदेवी विषयी...आपल्या हळुवार मनमोहक आणि तितक्याच नाजूक आवाजात येवलेकरांची संवाद साधतांना त्यांनी टाळ्याच नव्हे तर शिट्ट्या त्यावेळी मिळवल्या होत्या.
म्हणूनच आज त्यांच्या निधनाचे वृत्त या जुन्या आठवणी जाग्या करतानाच काही चाहत्याचे डोळे ओले करणारेही ठरले. या दोन तासांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त श्रीदेवीचे येथील जनतेशी तसे कुठलेही नाते नसताना त्यांनी आपल्या सुस्वभावी वागण्यातून आणि मनमोहक बोलण्यातून येवलेकरांच्या मनात केलेले घर आज पुन्हा एकदा आठवणी जाग्या करणारे ठरले. अनेकांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून श्रीदेवीच्या येवला भेटींच्या आठवणीला या दुःखात क्षणाच्या निमित्ताने उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com