स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार: सुळे

Supriya Sule
Supriya Sule

येवला : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करेन असे आश्वासन खासदर सुप्रिया सुळे यांनी दिले.येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विध्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या युवकांनी शनिवारी (ता.१७) येथे भेट घेऊन याप्रश्नी आवाज उठवण्यासाठी साकडे घातले.

आपण बेरोजगारीच्या प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी आवाज उठविला आहे व सरकारला धारेवर धरले आहे. बेरोजगार युवकांचे प्रश्न आपण धडाडीने मांडू शकतात. सुशिक्षित तरुण बेरोजगार आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे. आपण आमच्या मागण्यासंदर्भात विविध व्यासपीठावर आवाज उठवावा अशी मागणी या भेटीत सागर आचारी,अतुल काळे, अमोल बोरसे,निलेश सोनवणे,संदीप खुटे,संदीप नागरे,लखन शिंदे,कृष्णा धनवटे या युवकांनी सुळे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे कि,अनेक विद्यार्थी गेल्या चार वर्षापासून स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहेत. परंतु भाजपा शासन मात्र नोकर भरतीविषयी पूर्णपणे उदासीन आहे. यांनी नवीन नोकर भरती तर बंदच केली आहे, त्यात पण रिक्त पदांमध्येही ३० टक्के कपात केली आहे.अनेक ठिकाणी तर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहेत. मुठभर जागा काढून व प्रचंड फी आकारून सरकार केवळ महसूल गोळा करत आहे. अनेक परीक्षांचे निकाल रखडवले जात आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात जात आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड संख्येने बेरोजगार युवक जिल्ह्या-जिल्ह्यात व तालुक्यात रस्त्यावर उतरत आहे. मात्र सरकार या विषयावर ढिम्म आहे. त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सुळे यांना दिलेल्या निवेदनात सर्व सरकारी खात्यावरील रिक्त पदावरील बंदी त्वरित उठवावी व ३० टक्के नोकर कपात धोरण रद्द करण्यात यावे,पोलीस भरतीचे रिक्त पदे पुर्ण भरावे,एमपीएससीची संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा घेऊन १ हजार ५०० पेक्षा जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी,२०१६ साली घोषित केलेली तीन हजार पदाची तलाठी भरती एमपीएससी द्वारे घेऊन त्यासाठी जाहिरात काढावी,राज्य पातळीवर २०१० पासून रिक्त असलेल्या २३ हजार शिक्षकाची भरती त्वरित काढावी,परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्याना मिळालेल्या गुणांची यादी व प्रतीक्षा यादी नावासहित लावावी,एमपीएससीने तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅटर्न राबवावा,राज्यसेवेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ५०० पेक्षा जास्त जागा वाढवण्यात याव्यात आदि मागन्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com