मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्यांची सत्ता आम्हाला नको : सुळे 

Nashik News Supriya Sule suicide mantralay government
Nashik News Supriya Sule suicide mantralay government

निफाड : गरिबांच्या पोटाला भूक लागते. त्यांच्या पोटात दाणा नसेल तर तुमचा 'डिजिटल इंडिया' काय कामाचा आजपर्यंत पवारसाहेबांनी कधी गरिबीचे मार्केटिंग केले नाही. तसेच जर आम्ही सत्तर वर्ष काहीच विकासाची काम केली नसती तर गरीब घरचा पंतप्रधान झाला असता का असा सवाल करत सता येते आणि जाते त्याचे काही वाटत नाही. आम्हाला मंत्रालयातील होणाऱ्या आत्महत्याची सता नको. ती तुमच्या मनातील हवी असा केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निफाडच्या सभेत हल्लाबोल केला.

भाजप-शिवसेनेच्या शेतकरी सर्वसामान्य जनतेच्या धोरणांविरोधात निफाड येथील शिवाजी चौकात आज शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सभेचे अयोजन करण्यात आले होते या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ,जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, चित्रा वाघ, शशिकांत शिंदे, दिलीपराव बनकर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दीपिका चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, संग्राम कोते, रंजन ठाकरे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष अनिल कुंदे उपस्थित होते. 

या सभेत सुळे यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी, महिला सुरक्षा सह विविध धोरणावर प्रखर टीका केली तर राज्य शासनाच्या मराठी आणि अमराठी शाळांच्या धोरणावर राज्य शासनाला सज्जड दम दिला. जरी मराठी शाळा बंद केलीतर सरकारला घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच मराठीच राजकारण करणाऱ्या शिवसेना या विषयावर गप्प का असा सवाल उपस्थित केला.

...हे तर फसवणीस सरकार : धनंजय मुंडे

देशातील १२५ कोटी जनता अाता फसली 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्वप्नभंग केला. खात्यावर 15 लाख येणार, विदेशातील काळा पैसा आणणार, बेरोजगारी दूर करणार असे अनेक अाश्वासने देण्यात आली. प्रत्यक्ष मात्र काहीच नाही. महागाई मात्र वाढली. हे सरकार फसवणीस सरकार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com