नाशिक - न्यायडोंगरीच्या हलवाईचा दबदबा कायम

sweets
sweets

न्यायडोंगरी (नाशिक) : मिठाई जगतात न्यायडोंगरीच्या हलवाई मंडळीचा कायम दबदबा राहिला आहे. यांत्रिकी करणाच्या युगात देखील पारंपारिकतेने तयार केलेल्या येथील साखरहारला सध्या मोठी मागणी आहे. जुने ते सोने या उक्तीने चक्क हाताने तयार केलेल्या न्यायडोंगरीच्या साखरगाठीला यंदाही मोठी मागणी आहे.

विशेष म्हणजे न्यायडोंगरी व त्याच्या अवतीभोवतीच्या पंचक्रोशीतली जवळपास मोठ्या संख्यने असणाऱ्या लमाण तांड्यावर या साखर गाठींना मोठी मागणी असते राग लोभ, तंडे-बखेडे सगळ काही विसरून न्यायडोंगरी व आसपासच्या तांड्यावर साजऱ्या होणाऱ्या  होळीचा सणाचा उत्साह और काही असतो. होळी लमाणांच्या ऐक्याचे प्रतिकच अशा या सणाच्या निमित्ताने न्यायडोंगरी मधील शिवप्रसाद कायस्थ यांच्याकडील साखर हार, गाठी, नारळ, कंगण, आदी वस्तूंना प्रचंड मागणी असते जवळपास महिनाभर त्यांची तयारी सुरु असते साखर महाग असली तरी साखरेचा दर्जा महत्वाचा असतो, त्यामुळे पाकाचा दर्जा राखला जातो. आटवलेल्या पाकाला नंतर आकर्षक कलाकासुरीचा साज चढविला जातो व त्यातून आकाराला येतात ते नजरेत भरणारे हारकडे कंगण गाठी आदी स्वरूपातले दागिने.

नैसर्गिक रंग असल्याने त्यतील मोहकत लगेचच जाणवते शिवप्रसाद यांच्या पणजोबापासून हारकडे निर्मितीची साठ वर्षाहून ची परंपरा त्यांच्या चौथ्या पिढीत देखील कायम आहे. होळीपासून सुरु झालेल्या त्यांच्या या साखर मेहनतीला गुढी पाडवा पर्यंत ग्राहकांची दाद मिळत असते. जवपास एक दीड क्विंटल माल विक्री होत असते साधारणतः बाजारात हारकडे दुसरीकडे संभ्र रुपये प्रती किलो असा भाव असेल तर शिव प्रसाद कायस्थ यांच्या मालाला मात्र एकशे वीस रूपे असा भाव असतो इतरांपेक्षा वीस रूपे अधिक भाव असून ही ग्राहक मात्र शिब्प्रसाद यांच्याकडील तयार झालेल्या मालाला पसंती देतो ग्राहकांची ही त्यांच्यावरील दर्जापोती ठेवलेली विश्वासार्हता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com