सप्तश्रृंगी गडावर 10 हजार दिव्यांची आरास करुन दिपोत्सव

दिगंबर पाटोळे
रविवार, 14 जानेवारी 2018

शिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ व शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे १९ वर्ष असून दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ७ पदयात्रेकरुंनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी अडीचशे भाविक सहभागी झाले आहे.

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी मातेचे मुळ रुप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परीसरात आज धनुर्मासाची सांगता व भोगी निमित्त शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी (साकुरी शिव) व जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे १० हजार दिव्यांची आरास करुन नेत्रदीपक असा दिपोत्सव साजरा केला. 

शिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ व शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे १९ वर्ष असून दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ७ पदयात्रेकरुंनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी अडीचशे भाविक सहभागी झाले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात संस्थानच्या सहकार्याने भोगी व मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येस दिपोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी सव्वासात वाजता जगदंबा मातेची आरती सुरु होताच मंडळाच्या सदस्यांनी शिस्तबद्द नियोजन करीत पणत्या प्रज्वतील करण्यास सुरुवात करुन आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदीर व परीसरात दहा हजार पणत्या पेटवून दिपोत्सव साजरा केला. यावेळी मंदीर व परिसर नेत्रदिपक दिपोत्सवाने उजळुन निघाला होता. दिपोत्सव बघण्यासाठी वणीकरांनी मोठी गर्दी झाली होती. दिपोत्सवानंतर मंडळाच्यावतीने भजनसंध्येचा  कार्यक्रम संपन्न झाला. दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडाळाचे सदस्य, जगदंबा देवी न्यासाचे कार्यकारी मंडळाने परीश्रम घेतले.

Web Title: Marathi news Nashik news wani

टॅग्स