पाऊस व गारपिटीची टांगती तलवार कायम 

पाऊस व गारपिटीची टांगती तलवार कायम 

नाशिक  - हवामान विभागाने आजपासून 48 तासांत उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान अन्‌ हलक्‍या पावसाप्रमाणे गारपिटीची शक्‍यता वर्तवली होती. आज दिवसभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असताना वाऱ्याचा वेग मंदावला होता. सायंकाळनंतर हळूहळू ढग जमा होण्यास सुरू झाले होते. उद्या (ता. 24) दुपारनंतर मात्र काही ठिकाणी गारपीट होण्याची टांगती तलवार कायम आहे. 

द्राक्ष बागायतदार संघाच्या हवामानाच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक, सिन्नर, सटाणा, देवळा भागात उद्या दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होण्याची शक्‍यता आहे. तसेच या पट्टयात पावसाचा अंदाज आठ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यामुळे कितपत पाऊस होईल याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. याशिवाय येवला, मालेगाव भागात रिमझिम पावसाची शक्‍यता आहे. धुळे, औरंगाबाद परिसरात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या काढीला वेग दिला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगालप्रमाणे नेपाळमध्ये थंडी कमी झाल्याने तेथील ग्राहकांकडून द्राक्षांची मागणी वाढली आहे. त्यामुळे काढणीला वेग आला असला, तरीही भावात घसरण होण्याची शक्‍यता नसल्याचे संघाचे कैलास भोसले यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com