करवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नाशिक ः  मालमत्ता करवाढीचे संकट आणि  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील, विविध पक्ष,संघटनांचे पदाधिकारी यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरु केले आहे. भजन,किर्तन,घोषणाबाजी,छत्र्या घेऊन,काळ्या  फिती लावत आदी प्रकाराने आंदोलन करत निषेध नोंदवला. महापालिकेच्या राजीव गांधी भवनच्या जवळ हे आंदोलन सुरु आहे. अन्याय कृती समिती आणि आम्ही नाशिककर यांच्यातर्फे  हे आंदोलन झाले.

करवाढी विरोधात सातपूर बंद?
सातपूर गाव आज बंद,: आंदोलन स्थळी हिरवा व पिवळा पट्ट्यातील भाजी विक्री. हिरवा 10 तर पिवळा 40 रुपये किलो दराने भाजी विक्री करण्यात आली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सुरू असलेली आंदोलने. कोणाची भजने सुरू, कोण भाजीपाला,तर कोण काळ्या छत्र्या घेऊन, वकील, उद्योजक, शेतकरी, सर्वांची आंदोलाने साऱ्नेयाचे लक्ष वेधले. दरम्यान आज महापालिकेची महासभा आहे. मात्र या महासभेला आयुक्त तुकाराम मुंढेनी दांडी मारली आहे. याच वादळी महासभेत आयुक्त खासगी कारण देत रजेवर गेले आहे. आता महासभा काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news nashikkar andolan