एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाले आयएसओ मानांकन

marathi news nasik news s n d t college I S O
marathi news nasik news s n d t college I S O

येवला - गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपून नेहमीच मदतीचा हात देतांनाच सुविधा देत गुणवत्ता पूर्णता जपल्याने बाभुळगाव येथील एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राला आयएसओ 9001 : 2015 मानांकन मिळाले आहे. ग्रामीण भागातील गौरवलेले जिल्ह्यातील हे पहिले महाविद्यालय ठरले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत डिजिटल वर्ग, आत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य सेमिनार हॉल्स, ग्रीन टॉयलेट, भव्य क्रीडांगण, मुलांचे व मुलींचे वसतीगृह या सर्व सुविधांचा हा गौरव असल्याचे मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 

ग्रामीण भाग असल्याने हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गरीब व होतकरु विद्यार्थासाठी कमवा व शिका योजना, विद्यार्थी दत्तक योजना राबविली जाऊन सवलतीत प्रवेश दिले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा, वैयक्तिक मार्गदर्शन, आयजीटीआर औरंगाबाद सारख्या नामांकित संस्थेमार्फत कटिया व विविध सॉफ्टवेअर कोर्सेस दिले जातात. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद व विविध ठिकाणी औदयोगिक सहली महाविद्यालय आयोजित करते. कॅम्पसमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी महाविद्यालयाची बसची व्यवस्था तसेच भव्य वाहन पार्किंग व्यवथा केली आहे. आवारामध्ये विविध वृक्ष असल्याने हा परिसर निसर्गरम्य झालेला आहे.

महाविद्यालयाचे ग्रंथालय ग्रामीण भागातील सर्वात मोठे अद्यावत ग्रंथालय आहे. यात असलेली डिजिटल लायब्ररी विभाग, स्पिंगर, एएससीइ यासारखे नामांकित ई जर्नल्स, बारकोड प्रणाली येथे आहे. यामुळेच ग्रंथालयाला नॅशनल डिजिटल लायब्ररीचे सदस्यत्व प्राप्त आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू आहे. विविध शात्रज्ञानाची फोटोसहित माहिती असलेले छायाचित्राने महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंती बोलक्या झालेल्या आहेत. महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी, संगणक,
स्थापत्य, माहिती व तंत्रज्ञान, विदयुत, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन व मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीट्रेटिव्ह या शाखांचे एकूण दोन हजार 19 विद्यार्थी शिकत असून या सगळ्या उपलब्धतेची दखल घेऊन आयएसओ मानांकन मिळाले असल्याचे यावेळी प्राचार्य डॉ. कुदळ यांनी सांगितले. तसेच मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे हे या यशाबद्दल म्हणाले, 'वर्षानुवर्षे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परजिल्ह्यात जावे लागत होते. हि होणारी परवड थांबवून येवल्यातच शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी 2006 मध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले. येथून अनेक अभियंते शिकून आज नामांकीत पदावर आहे. महाविद्यालयाचा विस्तार होऊन थेट नॅक अॅक्रेडीटेशन व आयएसओ मानांकनापर्यंत गेल्याचे समाधान आहे.'
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com