उत्तर महाराष्ट्रात नाशिकला  विक्रमी महसूल वसूली 

residenational photo
residenational photo


नाशिक ः जीएसटी मुळे करमणूक करात झालेली घट, पर्यावरण हमीमुळे वाळू लिलावांना मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे उत्तर महाराष्ट्रातील महसूल वसूलीला फटका बसला. नगर जळगाव जिल्ह्यांना उदिष्ट्यही पूर्ण होउ शकले नाही. नाशिकला मात्र सुमारे 38 कोटीची जास्तीची महसूल वसूली झाली. 

नाशिकला उदिष्ट्याच्या 123 टक्के महसूल वसूली झाली. आर्थिक वर्षात महसूल वसूलीत नाशिकला विक्रमी 123 टक्के महसूल वसूली झाली. नगर व जळगाव दिलेले उदिष्ट्य पूर्ण होउ शकले नाही. नाशिक जिल्ह्यात मात्र जुन्या शर्तीच्या प्रकरणावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करीत अखेरच्या एका दिवसात 12 कोटीहून आधिकची 
वसूली केली. प्रत्यक्ष महसूल वसूली ऐवजी काही व्यवहारात पुस्तक नोंदीतून निधी वळते करतांना मालेगावसह इतर काही विभागाकडील थकीत वसूल्या वळत्या करुन घेत उदिष्ट्य पूर्तीसाठी प्रयत्न झाले. त्यामुळे महसूल वसूलीचे उदिष्ट्य साध्य झाले. 

महसूल वसूली कोटीत 
जिल्हा उदिष्ट्य वसूली घट-वाढ 
नाशिक 175 213 38 कोटी वाढ 
जळगाव 132 116 16 कोटी घट 
नगर 134 109 25 कोटी घट 
धुळे 55 56 1 कोटी 
नंदुरबार 44 45 1 कोटी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com