नीट' परीक्षेला पोशाखाचे बंधन 

residenational photo
residenational photo

इगतपुरी, ता. 21 : वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येत असलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट परीक्षेसाठी (नीट) विद्यार्थ्यांना पोशाखाचे बंधन घालण्यात आले आहे. येत्या 6 मेस होणाऱ्या या परीक्षेत पोशाखाबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. 

वैद्यकीय महाविद्यालयामधील प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दर वर्षी "नीट' परीक्षा घेण्यात येते. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून, हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जातात. "सीबीएसई'तर्फे परीक्षेदरम्यानच्या पोशाखाबाबत नियम जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे "सीबीएसई'ने कळविले आहे. विद्यार्थ्यांना फिक्‍या रंगाचे आणि अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालावयाचे असून, त्यावर मोठी बटने किंवा बॅजेस लावता येणार नाहीत. त्याचप्रमाणे जोडे न वापरता केवळ चप्पल घालूनच परीक्षेला येण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

जीन्स, शर्ट असे कपडे चालणार असले तरी कुर्ता, पायजाम्यावर मात्र बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षेला बसता येणार नाही. हिजाब तसेच बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली असली तरी पारंपरिक पोशाख घालणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या बऱ्याच आधी परीक्षा केंद्रावर पोचावे लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची केंद्रावर तपासणी केली जाणार आहे. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपास, पिन्स, कॅल्क्‍युलेटर अशी कोणतीही साधने स्वतःबरोबर आणता येणार नाहीत. याशिवाय गॉगल, वॅलेट, पाउच, हॅंडबॅग, बेल्ट, रुमाल अशा वस्तू नेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची संवादाची तसेच इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधने घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com