महापालिकेत दोन हजार पदे रिक्त,डिसेंबर अखेर शंभर कर्मचारी निवृत्त

residenational photo
residenational photo

नाशिक : महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजुर पदांपैकी अद्यापपर्यंत एक हजार 848 विविध संवर्गातील पदे रिक्त असून डिसेंबर अखेर पर्यंत यात आणखी शंभर रिक्त पदांची भर पडणार आहे. आता पर्यंत पालिकेने रिक्त पदे न भरल्याने सध्या अस्तित्वातील 5242 कर्मचायांवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे.

पालिकेने नव्याने आकृतीबंध तयार करण्याचे काम हाती घेतले असून यात परिशिष्ठावरील मंजुर पदांबरोबरचं नवीन पदांचा समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे अधिकारांचे केंद्रीकरण रोखतं विभागिय कार्यालये अधिक सक्षम करण्यावर नवीन आकृतीबंधा मध्ये भर देण्यात आला आहे. 

दिड हजारांहुन अधिक निवृत्त

महापालिकेच्या आस्थापनेवर 7090 पदे मंजूर आहेत. आतापर्यंत एक हजार 848 लोक सेवानिवृत्त झाले असून ती रिक्त पदे भरली गेली नाही. रिक्त पदांमध्ये प्रशासन 424, अभियांत्रिकी 540, लेखापरीक्षण 44, अग्निशमन 62, सुरक्षा 82, उद्यान 42, मोटार दुरूस्ती 124, संगणक 5, जलतरण 10, कालिदास 10, आरोग्य 121, वैद्यकीय 303, मलेरीया 43, खतप्रकल्प विभागातील अठरा पदांचा समावेश आहे. शासनाने सन 1993 मध्ये पालिकेच्या आस्थापना परिशिष्ठाला मंजुरी दिली होती.

पुर्वी पालिकेचा क वर्ग होता आता ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी 14 हजार 746 पदांचा आकृतीबंध तयार करताना यात सात हजार 656 नवीन पदे निर्माण केली होती. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिक पदांची निर्मिती असलेला आकृतीबंध धुडकावतं फेर आकृतीबंध सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

प्रशासनाकडून कामास सुरवात

 प्रशासनाकडून काम सुरु आहे. यात अधिकारी, कर्मचायांचे फेरनियोजन हाती घेण्यात आले आहे. सुधारीत आकृतीबंधामध्ये विभागिय कार्यालये सक्षमीकरणावर भर दिला जात असून येत्या काळात विभागिय अधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्राप्त होणार आहे. 

महापालिकेत मंजूर पदे 
महापालिका आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गांत एकूण सात हजार 90 मंजूर पदे असून यात अ गटातील 139, ब -83 , क -2199 व ड 4669 गटातील पदांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com