गृहउद्योगातून दिला पस्तीस बेरोजगार कुटुंबांना रोजगार

Vidya-Pardeshi
Vidya-Pardeshi

इगतपुरी : 'उद्योगात वसते लक्ष्मी’ असे वचन आहे आणि जेव्हा एखाद्या घराची गृहलक्ष्मीच उद्योगांचा ध्यास घेते आणि व्रत म्हणून पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ हा वसा चालवते तेंव्हा अर्थातच त्यांच्या या कार्याचे वर्णन ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ असेच करता येईल. एका मध्यमवर्गीय मराठी कुटूंबातील एक मुलगी आपल्या आईच्या उद्योगशिलतेचे गुण आत्मसात करून वारसा पुढे सुरु ठेवते. म्हणूनच त्या सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत. 

विद्याताई परदेशी यांचा माहेरचा व्यवसाय फरसाण विकण्याचा होता त्या उद्योगापासून त्यांनी गावात फरसाणचा व्यवसाय  सुरू केला आज त्यांचा व्यवसाय नाशिक पुरता मर्यादित न राहाता मोठ्या प्रमाणात उद्योगात भर पाडत घोटी सारख्या छोट्या शहरातून राधेश्याम फरसाण अँड स्वीट होम सारखा छोटा कारखाना उभारून बेरोजगारांना रोजगार भेटेल असा गृहउद्योग सुरू केला हा व्यवसाय मर्यादित क्षेत्रात न राहता महाराष्ट्रातील नाशिक, नगर, ठाणे अशा विविध ठिकाणी उद्योगाचे जाळे पोहचविण्याचे काम यशस्वी महिला उद्योजक विद्याताई रमेश परदेशी यांनी केले आहे. 

महिलांच्या उद्योगशिलतेचा ध्वज फडकावित, महिला व लघु उद्योजकांसाठी मोठे उद्योजकता प्रदर्शन आयोजित करून यशस्वी करून दाखवते तेव्हा त्यांच्या या कार्याला सॅल्यूटच करावा लागतो. आजही कुठल्याही परिस्थितीला आणि संकटाला न डगमगता अष्टोप्रहर केवळ उद्योगाच्या माध्यमातून अक्षरश: महिलांना त्यांनी उद्योग शील करून जीवनात गृहद्योगाच्या माध्यमातून सक्षम करीत आहेत. महिला सक्षमीकरणाचा हा महायज्ञ प्रत्यक्षात घडवूनही नम्रतेने आणि आपल्या मधूर स्वभाव विद्याताई परदेशी यांच्यासारख्या ‘उद्योग तपस्विनी’ महिला उद्योजिकांना दिपस्तंभासारख्या मार्ग देत आहेत. 

गेल्या पस्तीस वर्षांपासून फरसाणचा व्यवसाय सुरू करून या छोट्याशा उद्योगात भरारी घेण्याचे काम विद्याताई परदेशी यांनी केले आहे हलाखीच्या परिस्तिथीला ना डगमगता परदेशी यांनी छोटा कारखानाच उभा केला असून त्यांच्या या कारखान्यावर जवळपास तीस ते पस्तीस कुटुंबाना रोजगार मिळवुन दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com