आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडवले  

lure of army job loss of lacs of rupees
lure of army job loss of lacs of rupees

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील बर्‍याच जणांना आसाम रायफल्स आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याच्या अमिषाने कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. आज मेहुणबारे पोलिस ठाण्यात कळमडु (ता. चाळीसगाव) येथील तरूणाने फसवणूक केलेल्या तिघा भामट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

कळमडु येथील दिपक मधुकर केदार (वय 24) हा सुशिक्षीत बेरोजगार तरुण बारावी उत्तीर्ण झालेला होता. त्याची त्याच्याच गावात राहणाऱ्या सुधीर कैलास भिल्ल (सोनवणे) व त्याचे वडील कैलास उत्तम भिल्ल (सोनवणे) यांच्याशी चांगला परिचय झाला. त्यानंतर जुन 2015 मध्ये कैलास भिल्ल व सुधीर भिल्ल यांनी त्यांच्या ओळखीचा संजय लक्ष्मण अडकमल (रा.नगरदेवळा ता.पाचोरा) हा आर्मीमध्ये नोकरी लावुन देण्याचे काम करतो. परंतू त्याला त्या मोबदल्यात अॅडव्हन्स म्हणुन काही रक्कम द्यावी लागते, असे सांगितले. या तरूणाला नोकरीची गरज असल्याने त्याने कैलास व सुधीर भिल्ल यांना होकार दिला.

दीपक केदार या तरूण पैसे देणार असल्याने या दोन्ही महाभागांनी नगरदेवळा येथील संजय अडकमल याला कळमडु येथे बोलावुन या दोघांनी दिपकचा परिचय  करून दिला. त्यावेळी या तिघांनी या तरूणाचा विश्वास संपादन करून तुला आसाम रायफल्स किंवा आर्मीमध्ये नोकरी हमखास लावुन देण्याचे आमिष दाखविले व दिपक केदारकडे तीन लाखांची मागणी केली. त्या तिघांवर विश्वास ठेवुन दीपक केदार याने गावातील सोमेश गायकवाड, प्रकाश पाटील, समाधान केदार यांच्यासमक्ष सुधीर भिल्ल यांच्या घरी कैलास भिल्ल याच्याजवळ पैसे दिले. यांनी ते  संजय अडकमल याला दिले. त्यावेळी पैसे दिल्याचे लेखी मागितले असता सुधीर भिल्ल याने काम न झाल्यास पैसे परत आणून देण्याची हमी घेतली.

दीपक केदार यास संजय अडकमल याने 25 जुन 2015 रोजी आसाम रायफल्स दिमापुर या ठिकाणाचे आॅपईमेन्ट लेटर या तरूणाच्या हाती देवुन शिलाॅग व मेघालय येथे जनरल ड्युटी या पदासाठी भरती होणार आहे, असे सांगुन या तरूणाला हा भामटा 26 जुन 2015 रोजी शिलाँगला घेऊन गेला परंतु आशी कुठल्याही प्रकारची भर्ती तेथे नसल्याने या तरूणाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. मात्र या झालेल्या प्रकाराची अडकमल यांनी दिपकने विचारले असता त्याने तेथेच वाद घालण्यास सुरुवात केली.व तुझे पैसे लवकरात लवकर परत करू असे आश्वासन अडकमल यांनी  दिले.

दीपक केदार याला संजय अडकमल यांने पैसे परत करण्याचे आश्वासनाला  तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली. दिपक केदार याने संजय अडकमल यांच्याकडे पैसे मागण्याचा तगादा लावल्यानंतर त्यांने या तरूणाला अडकमल याने 3 नोव्हेंबर 2017 ला आयसीआयसीआय बँकेचा तीन लाखाचा धनादेश दिला. मात्र सदर धनादेश बँकेत न वटल्याने या तरूणाने गावातील कैलास भिल्ल, सुधीर भिल्ल व संजय अडकमल यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. मात्र तरीही पैसे परत मिळाले नाही. असेच अजुन सोमेश गायकवाड (1 लाख 50 हजार रूपये) प्रकाश पाटील, (2 लाख 50 हजार रूपये) समाधान केदार (2 लाख 70 हजार रूपये ) अशी या चौघांची 9 लाख 70 हजार रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी आज मेहुणबारे पोलिस ठाण्यात कैलास भिल्ल, सुधीर भिल्ल व संजय अडकमल यांच्या विरोधात दीपक केदार याने तक्रार दिली असुन या तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक हेमंत शिंदे हे करीत आहेत.

कळमडु  येथील तरुणांची फसवणूक झाल्याचे बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची कुणकुण फसवणूक केलेल्या या तिघांना लागल्याने तक्रार देणाऱ्या तरूणाला,' तुझे पैसे परत देता' तक्रार करू नको असे सांगितले. हा तरूण आज सकाळी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार मागे घेण्यासाठी गयावया करत होता. परंतु मेहुणबारे पोलिसांनी अखेर या तरूणाची तक्रार घेवुन या तिघांवर गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com