सामान्य माणूस सोशल मिडीयावर नगरसेवक ते राष्ट्रपती होतोय

Social Media
Social Media

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या ग्रामीण भागातील फेसबुक युजर्सही गल्ली ते दिल्ली पर्यंतचा प्रवास करत असताना दिसत आहेत. कारण, तुम्ही राजकारणात कोणत्या पदावर जाल? अशी फेसबुक पेजवर प्रोफाईल येते आणि सुरु होतो राजकारण्यांचा धुमाकूळ ! सध्या सुरु आहे. कारण सर्वसामान्य माणूसही नगरसेवक, विधानसभा सभापती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापैर, नगरसेवक, सरपंच अगदी सहज एका क्लिकवर होत असल्याने सध्या याचीच सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. त्यांना जोरदार प्रतिक्रीयासह अभिनंदनाचा देखील जोरदार वर्षाव होत असताना दिसत आहे.

मला आमदार झाल्यासारखं वाटतय’ हे लोकगीत सर्वपरिचित आहे, मात्र फेसबुकवर ‘आमदारच’ नव्हे तर अगदी सरपंच, नगरसेवकापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यंत कसलेच बंधन नसल्याने जो तो मंत्री होण्याचा आस्वाद घेत आहे. फेसबुकवर विचारलेल्या ‘तुम्ही कोणत्या पदावर जाल? या प्रश्नाच्या उस्तुकतेने या मेजिक प्रोफाईलवर जावून आपली राजकीय कुवत अजमावत आहेत.

त्यात अनेकांना मोठी पदं मिळत असून काहींना सरपंच पदावरच आपली राजकीय भूक भागवावी लागत आहे. आपल्याकडे मुख्यमंत्री पदाची राजकीय कुवत असताना आपण सोशलवर केवळ सरपंच बनलो,या भावनेने अनेकजण फेसबुकच्या प्रोफाईलवर नाराज आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून फेसबुकवरील हे राजकारणाचे वारे थांबायला तयार नसल्याने अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना टार्गेट करत यांची खाल्ली उडवायला सुरुवात केली आहे. फेसबुकवर निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित उमेदवार हे अमुक पक्षाचेच ! आत्ता आपला माणूस मुख्यमंत्री,पंतप्रधान राष्ट्रपती मग अर्धा रात्री काम होतील, आम्हाला नोकरीला लावा साहेब अश्या गंमतीदार पोस्ट करून चर्चेला उधाण आणत आहेत. एवढेच नव्हे तर ‘ आपल्या अंगी कोणत्या नेत्यांचे गुण आहेत ? हा प्रश्न देखील फेसबुकवर चांगलेच वेगाने फिरत आहेत. त्या प्रोफाईलवर देखील मोठमोठ्या नेत्यांचे नाव येत असून त्यांचे गुण आपल्या अंगी येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने काहींना त्याची हौस वाटत आहे. आगामी निवडणुकांचा प्रचारच या मध्यमातून सोशलमिडीयावर केला जात असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरीकातून व्यक्त केली जात आहे.

तरुणाई सोशल मिडीयाच्या आहारी 
सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला थांबवणे जिकरीचे झाले आहे. कमी खर्चार जास्त इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वच वेळ सोशल मिडीयाच्या दिनुयेत जात आहे.सोशालचा ‘सोसेल’ तेवढाच वापर न झाल्यास तरूणाई बेरोजगारीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com