उपसरपंचाकडून सदस्याचे अपहरण; पत्नीची पोलिसात तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

लोहारा (ता. पाचोरा) ः येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसंरपंच अक्षयकुमार जैयस्वाल यांच्या विरोधात अविस्वास ठराव प्रस्तावावर सही केली आणि तो ठराव पारित होऊ नये; म्हणून पती गंगराम सुर्यवंशी (भिल) यांचे अपहरण केले. तसेच जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरण उपसरपंच जैस्वाल यांच्यासह चार जणांविरुद्ध अपहरण व ऍट्रॉसीटीचा गुन्हा पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

लोहारा (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षयकुमार उत्तमलाल जैस्वाल हे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी कारभार करतात. या कारणावरून गुरूवारी (ता. 26) 17 पैकी 11 सदस्यांनी अविश्‍वास प्रस्तावावर सही करुन सदरचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर केला. अविश्वास ठराव 31 मेस पारित होऊ नये. यामुळे सदस्यांना गैरहजर ठेवायचे म्हणून अक्षयकुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम भिल यांचे घरुन महेंद्र कटारिया यांनी स्विप्ट गाडी (क्र. एम. एच. 19, सीएफ 2171) जातीवाचक शिविगाळ करत अपहरण केले. अशी तक्रार अपहरण करून नेलेले गंगाराम भिल यांच्या पत्नी छायाबाई गंगाराम सुर्यवंशी (भिल) यांनी पोलिसात दिली आहे. यावरून उपसरपंच अक्षयकुमार जैस्वाल, महेंद्र कटारिया, शांताराम चौधरी, राहुल कटारिया, (सर्व राहणार लोहारा) यांच्याविरुद्ध अपहरणसह ऍट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास डीवायएसपी केशव पांतोडे करित आहेत. 

Web Title: marathi news pachora kidnap grampanchayat member