वर्षभरात 318 परमीटबारचे परवाने रद्द 

residenational photo
residenational photo

नाशिक : राष्ट्रीय तथा राज्य महामार्गापासूनच्या 500 मीटर अंतराच्या आत असलेले परमिट बाररुम व मद्यविक्री करण्यावर बंदी आल्यानंतर जिल्ह्यातील 318 परमीटबार व मद्यविक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तर, 31 नव्याने परवाने देण्यात आल्याने सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 829 परवानेधारक परमीटबार व मद्यविक्रत्यांची दुकाने सुरू आहेत. गेल्या आर्थिक वर्षामध्ये हेच परवाने 1116 होते.  

रस्ता अपघातामध्ये मद्यप्राशन करून मृत्युमुखी पडणाऱ्या चालकांची संख्या लक्षणीय असल्याचे एका सर्वेक्षणातून सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तथा राज्य महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेले परमीट बार आणि मद्यविक्री करण्यावर बंदी घातली होती. परिणामी राज्यासह देशभरातील राष्ट्रीय-राज्य महामार्गालगतच्या परमीट रूम बीअरबार आणि मद्यविक्री करण्यांची परवाने रद्द करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई सुरू केली होती. 
गेल्या 31 मार्च 2017 अखेरपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 117 परवानेधारक परमीट रुम बीअरबार आणि मद्यविक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरू झाल्याने 1 एप्रिलपासूनच जिल्ह्यातील 808 परमीट रुम आणि मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर परमीट रुम व मद्यविक्री असोसिएशनने याबाबत राज्याकडे धाव घेतली असता, त्यानंतर शहरातील जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दुकाने व परमीट बारच्या बाबतीत शिथिलता देण्यात आली. त्यानुसार, गेल्या सप्टेंबर 2017 मध्ये जिल्ह्यात 798 परमीट रुम व मद्यविक्री दुकाने सुरू झाली. मात्र 318 परमीट बार व दुकानांचे परवाने रद्द करण्यात आली होती. तर काहींनी स्थलांतरीत होत नव्याने परवाने घेतले. जिल्ह्यात असे 31 व्यावसायिकांना नव्याने परवाने चालू आर्थिक वर्षांमध्ये देण्यात आले. त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 829 परवानेधारक परमीट बार आणि मद्यविक्री दुकाने सुरू आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेमध्ये 287 परमीटबार व दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अजूनही विनापरवाना परमीट रुम बीअरबार वा वाईन शॉपी विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. तसेच, काही मार्गावरील ढाब्यांवरही चोरीछुप्यारितीने मद्यविक्री केली जाते. त्याविरोधातही भरारी पथकाकडून कारवाई केली जात असून अशारितीने अवैधरित्या व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावी. 
- सी.बी. राजपूत, जिल्हा अधीक्षक, राज्य ÷उत्पादन शुल्क विभाग. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com