तरुणाई, व्यापाऱ्यांची मुले ड्रग्सच्या आहारी, पोलिसांचे दोन पथके रवाना 

residenational photo
residenational photo

नाशिक : नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केलेल्या अंमली पदार्थांच्या संशयितांच्या जाळ्यात अडकल्याने शहरातील उच्च व मध्यमवर्गीयांची महाविद्यालयीन व व्यापाऱ्यांची मुले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. दर आठवड्याला किमान अडीचशे ते पाचशे ग्रॅम एमडी या नावाचा अंमलीपदार्थ मुंबईतून आणून नाशिकमध्ये विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संशयित ज्यांच्याकडून अंमली पदार्थ खरेदी करीत होते त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके मुंबईत तळ ठोकून आहेत. 
  नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंमलीपदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय खबर पोलिसांनी होती. परंतु, खरेदीदार पकडून पोलिसांना पुरेशी माहिती मिळत नसल्याने पोलीस याप्रकरणावर सातत्याने पाळत ठेवून होते. त्यामुळेच संशयित रणजित मोरे (32,रा. हरिविश्‍व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज दुंडे (31, रा. वृंदावननगर, आडगाव शिवार), नितीन माळोदे (32, रा. वृंदावननगर, आडगाव शिवार) हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. यातील रणजित मोरे हा म्होरक्‍या असून त्यानेच शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या मुलांना ड्रग्सची नशा लावली आहे. 
   एमडी अंमलीपदार्थाची मुंबईत चोरीछुप्या विक्री होत असतांना, नाशिकचे हे तिघे संशयित आठवड्याला किमान अडीचशे ते पाचशे ग्रॅम अंमलीपदार्थ आणायचे आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-व्यापाऱ्यांच्या मुलांना विकायचे. नशेच्या आहारी गेलेल्या याच मुलांच्या माध्यमातून संशयितांनी शहरात जम बसविला होता. एमडी ड्रग्स्‌च्या आहारी गेलेले मुले ही उच्च व मध्यम वर्गीय कुटूंबियातील असून त्यांच्या पालकांनाही मोठा धक्का बसला आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या या मुलांचे पोलीसांकडून समुपदेशन केले जाणार आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

1 ग्रॅम म्हणजे भुख्खी असा कोडवर्ड 
अंमलीपदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या काळ्याबाजारात 1 ग्रॅम एमडी ड्रग्ससाठी 2 हजार रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी खरेदीदारांकडून एक भुख्खी असा कोडवर्ड (सांकेतिक शब्द) वापरला जायचा. सध्यातरी तिघे संशयित शहरात अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे निष्पन्न होत आहे. तर, जप्त केलेली टाटा सफारी कार (एमएच 15 इक्‍यु 5005) मंडलिक नामक इसमाची असून त्याने संशयित दुंडे याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये उसनवार घेत कार वापरण्यास दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 

मूळावरच घाव 
पोलिसांनी माहितीच्या आधारे ज्यांना ताब्यात घेतले ते एमडीची नशा करणारे खरेदीदार होते. त्यांच्याच आधारे पोलिस नाशिकमध्ये एमडीची विक्री करणाऱ्या तिघांपर्यंत पोहोचले. आता याच तिघांच्या माध्यमातून पोलीस मुंबईतील ड्रग्सविक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिकमध्ये लपणाऱ्या मुंबईच्या गुन्हेगारांना चाप लावल्यानंतर आता ड्रग्स माफिया नाशिकमध्ये आपला व्यवसाय फैलावण्याच्या प्रयत्नांना नाशिक पोलीसांनी कारवाई करीत चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com