मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेत संगीत देवभाबळी प्रथम

residenational photo
residenational photo

नाशिक : ३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी  ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. ९ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण१० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेत  श्याम भूतकर,वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, श्री. जयंत पवार आणि श्रीमती शकुंतला नरे हे परिक्षक होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

-सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या अनन्या या नाटकास रु. ४लाख ५० हजाराचे व्दितीय पारितोषिक

-त्रिकुट, मुंबई या संस्थेच्या वेलकम जिंदगी या नाटकास रु. ३लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

 अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१,५०,०००/-) प्रताप फड (नाटक-अनन्या)

  व्दितीय पारितोषिक (रु.१,००,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)

 तृतीय पारितोषिक (रु. ५०,०००/-) स्वप्नील बारस्कर (नाटक-अशीही श्यामची आई)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१,००,०००/-) प्राजक्त देशमुख (नाटक-संगीत देवबाभळी)

  व्दितीय पारितोषिक (रु.६०,०००/-) अजित दळवी (नाटक-समाजस्वास्थ)

  तृतीय पारितोषिक (रु.४०,०००/-) चैतन्य सरदेशपांडे (नाटक-माकड)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) प्रफुल्ल दिक्षित (नाटक-संगीत देवबाभळी)

 व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) भूषण देसाई (नाटक-अनन्या)

  तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) राजन ताम्हाणे (नाटक-वेलकम जिंदगी)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) संदेश बेंद्रे (नाटक-अनन्या)

 व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) प्रदिप मुळे (नाटक-संगीत देवबाभळी)

 तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) प्रसाद वालावलकर (नाटक-अशीही श्यामची आई)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) आनंद ओक (नाटक-संगीत देवबाभळी)

 व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) समीर साप्तीकर (नाटक-अनन्या)

 तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) अभिजित पेंढारकर (नाटक-अशीही श्यामची आई)

वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) महेश शेरला (नाटक-संगीत देवबाभळी)

 व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) माधुरी पुरंदरे (नाटक-समाजस्वास्थ)

 तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) चैताली डोंगरे (नाटक-वेलकम जिंदगी)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४०,०००/-) सचिन वारीक (नाटक-संगीत देवबाभळी)

 व्दितीय पारितोषिक (रु.३०,०००/-) शरद सावंत व सागर सावंत (नाटक-वेलकम जिंदगी)

तृतीय पारितोषिक (रु.२०,०००/-) संदीप नगरकर (नाटक-अशीहीश्यामची आई)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५०,०००/-

पुरुष कलाकार : राहुल शिरसाट (नाटक-माकड), सिध्दार्थ बोडके (नाटक-अनन्या), अतुल पेठे (नाटक-समाजस्वास्थ), मकरंद अनासपुरे (नाटक-उलट सुलट), भरत जाधव (नाटक-वेलकम जिंदगी)

स्त्री कलाकार : सोनाली मगर (नाटक-माकड), शुभांगी सदावर्ते (नाटक-संगीत देवबाभळी), अतिशा नाईक (नाटक-अशीही श्यामची आई), ऋतुजा बागवे (नाटक-अनन्या), शिवानी रांगोळे (नाटक-वेलकम जिंदगी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com