विदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास,खासदार राऊत यांची टिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नाशिक  विदर्भ महाराष्ट्राचाचं एक भाग आहे, त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही. दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत असेल तर असा विकास चुकीचा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यापुर्वी मुंबईतील उद्योग गुजरात मध्ये पळवून नेल्याची आठवण त्यांनी करून दिली. 

नाशिक  विदर्भ महाराष्ट्राचाचं एक भाग आहे, त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही. दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत असेल तर असा विकास चुकीचा आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यापुर्वी मुंबईतील उद्योग गुजरात मध्ये पळवून नेल्याची आठवण त्यांनी करून दिली. 

   नाशिक मधील फार्मासिटीकल कंपन्या नागपूर मधील मिहान प्रकल्पात पळवून नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकायांची बैठक घेतल्याचे वृत्त आज सकाळने प्रसिध्द केले त्यापार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रतिक्रिया दिली. मुंबईत महत्वाच्या कंपन्या गुजरातला पळविल्याचे सांगताना राऊत यांनी विदर्भात नवीन उद्योग हवेत परंतू नाशिक भकास करण्याची गरज नाही. नाशिकचा घास हिरावून विदर्भात नेवू नका असा सल्ला त्यांनी दिला. 
 
मुंढेना महसुल खाते द्या 
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंढे यांची नियुक्ती जेथे झाली तेथे त्यांनी वादग्रस्त निर्णय घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रालयात नियुक्ती देवून त्यांच्याकडून महसुल वाढवायला हवा असा सल्ला खासदार राऊत यांनी दिला. करवाढीमुळे नाशिककरांचे शोषण होणार आहे. हि बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची गरजं आहे. शिवसेनेने करवाढी विरोधात ठोस भुमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. 
---------- 
राऊत म्हणतात.... 
- शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र बैठक 6 मेस नाशकात 
- उद्धव ठाकरे सर्व प्रमुखांशी बोलणार 
- आगामी निवडणूक संदर्भात प्रत्येकाची मतं जाणून घेणार 
- दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत वाद नाही, शिवसेनेविरुद्ध अपप्रचार. 
- राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा 
- जनतेचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प कोणीही लादू शकत नाही 
- कास्टिंग काउच वरून रेणुका चौधरी यांचं वक्तव्य म्हणजे संसदेचा अपमान 
- कास्टींग काऊच हे कदाचीत कॉंग्रेसचं कल्चर. 

 

Web Title: MARATHI NEWS RAUT PRESS CONF